29 April 2025 5:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Post Office Investment | पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना, 50 रुपये गुंतवणूक करून मिळवा 35 लाख परतावा, तपशील जाणून घ्या

Post Office Investment

Post Office Investment | भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन योजना बाजारात लाँच करत असते. अशीच एक अल्पबचत गुंतवणूक योजना आहे, तिचे नाव आहे “ग्राम सुरक्षा योजना”. या योजनेत तुम्ही फक्त 50 रुपये रोज गुंतवणूक केले तर, तुम्हाला पुढील काळात 35 लाख रुपयांचा नफा होऊ शकतो. चाल तर मग जाणून घेऊ ही योजना सविस्तर

पोस्ट ऑफिस स्कीम :
इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये जी गुंतवणूक आपण करतो ती पूर्णपणे सुरक्षित आणि नॉन लिंक्ड मानली जाते. वास्तविक, कोणत्याही गुंतवणुकीत थोडीफार जोखीम तर असतेच, आणि आर्थिक जोखीम घेण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. अशा परिस्थितीत, अशा योजनेत गुंतवणूक करा जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला शून्य जोखमीसह भरघोस परतावा मिळेल. तुम्हीही अशी एखादी गुंतवणूक योजना शोधत असाल तर इंडिया पोस्ट ऑफिसने तुमच्यासाठी एक अल्पबचत गुंतवणूक आणली आहे, ह्यात तुम्ही गुंतवणूक करून जबरदस्त नफा कमवू शकता.

35 लाखांचा अप्रतिम परतावा :
इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी अल्पबचत योजना राबवत असते, जर तुम्हाला दीर्घकाळासाठी छोटी बचत करून मोठा परतावा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिस ची ग्राम सुरक्षा योजना तुमच्यासाठी योग्य राहील. या योजनेत आर्थिक जोखीम खूप कमी आहे, आणि गुंतवणुकीवर जबरदस्त परतावाही दिला जातो. पोस्ट ऑफिसद्वारे सुरू केलेली ही ‘ग्राम सुरक्षा योजने’ एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देते, ज्यामध्ये तुम्हाला खूप कमी जोखमीसह भरघोस व्याज परतावा दिला जातो. या ग्राम सुरक्षा योजनेत तुम्हाला दरमहा फक्त 1500 रुपये गुंतवणूक करावी लागेल, ही रक्कम नियमितपणे गुंतवणूक केल्यास पुढील काळात तुम्ही 31 ते 35 लाखांचा नफा कमवू शकता.

गुंतवणुकीचे नियम सविस्तर :
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक पैसे जमा करून गुंतवणूक करू शकते. या योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेची प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर करता येते. या योजनेची प्रीमियम रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची मुदत दिली जाते. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्ही कर्ज घेण्यास पात्र असाल. एकदा या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास 3 वर्षांनंतर तुम्ही ती सरेंडरही करू शकता. परंतु जर तुम्ही योजना बंद केली तर तुम्हाला व्याज परतावा मिळणार नाही.

गुंतवणुकीवर परतावा :
समजा तुम्ही तुमच्या वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजनेत पैसे जमा करायला सुरुवात केली तर, आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याच्या मासिक प्रीमियम पोटी तुम्हाला 55 वर्षांसाठी दर महिन्याला 1515 रुपये जमा करावे लागतील. 58 वर्षांसाठी जी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 1463 रुपये जमा करावे लागतील. आणि 60 वर्षांसाठी तुम्हाला 1411 रुपये जमा करावे लागतील. अशा परिस्थितीत, नियमित गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला 55 वर्षांनंतर 31.60 लाख रुपये व्याज परतावा मिळेल. 58 वर्षांनंतर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांनंतर 34.60 लाख रुपये परतावा दिला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Investment Scheme of Gram Suraksha Yojana benefits check details 27 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या