5 November 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Post Office Investments | पोस्ट ऑफिस योजनांच्या गुंतवणुकीतून कधी बाहेर पडू शकता | जाणून घ्या नियम

Post Office Investment

Post Office Investments | पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही सर्व अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करता. अनेक योजनांना लॉक-इन कालावधीही असतो. जर एखाद्या विशिष्ट कारणासाठी तुम्हाला पैशांची नितांत गरज असेल आणि तुम्हाला गुंतवणूक योजनेतून (प्रिमॅच्युअर एन्कॅशमेंट रूल्स) बाहेर पडायचे असेल, म्हणजेच तुम्हाला पैसे पूर्णपणे काढायचे असतील तर त्यासाठी काही निश्चित अटी आणि नियम आहेत. तुम्ही त्यांना समजून घेतले पाहिजे.

Post office, you invest in various small savings schemes. Many schemes also have a lock-in period. There are certain conditions and rules for this. You must know them :

आपण ही खाती कधीही बंद करू शकता :
तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट बंद करू शकता. अधिकृत वेबसाइटनुसार, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकही बचत योजनेचे खाते कधीही बंद करून आपल्या ठेवीचे पैसे काढू शकतात. मात्र, आपल्याला त्यासाठी निश्चित शुल्क भरावे लागू शकते.

Recurring Deposit Account – रिकरिंग बचत खाते :
जर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली असेल तर तीन वर्षांनंतर तुम्ही कधीही (प्रीमॅच्युअर एन्कॅशमेंट रूल्स) अकाउंट बंद करू शकता. यामध्ये केवळ सेव्हिंग बँक खात्याचा व्याजदर लागू होणार आहे.

Monthly Investment Scheme – एमआयएस खाते
पोस्ट ऑफिस बचत योजना खाते अर्थात एमआयएस एक वर्षानंतर बंद करता येते. त्याचबरोबर किसान विकास पत्र खातेही 2 वर्ष 6 महिने म्हणजेच अडीच वर्षानंतर बंद करता येणार आहे.

Post Office PPF – पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यासाठी नियम :
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) अकाउंट ओपन केलं असेल, तर किमान पाच वर्षांनंतरच तुम्हाला तुमचं खातं बंद करता येणार आहे. गंभीर आजार, उच्च शिक्षणाची गरज किंवा एनआरआय असाल तरच हे शक्य होईल, हे लक्षात ठेवा.

सुकन्या समृद्धी खाते :
पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल, तर मुलींच्या लग्नास किमान १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच (सध्या मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे झाले असले तरी) मुलींशी संबंधित या सरकारी योजनेचे खाते बंद करता येईल.

राष्ट्रीय बचत योजना :
पोस्ट ऑफिसमधील नॅशनल सेव्हिंग स्कीम – एनएससी (VIII Issue) खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद करता येत नाही. मात्र खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा जप्ती झाल्यास या योजनेची (पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज स्कीम्स) खाती बंद केली जातात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Post Office Investment schemes check details 30 April 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x