23 January 2025 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Post Office Investment | ही सरकारी गुंतवणूक योजना तुम्हाला 5 वर्षात 13.95 लाख रुपये देईल, जाणून घ्या संपूर्ण हिशेब

Post office investment

Post Office Investment | आजकालच्या वाढत्या महागाईच्या काळात, जर तुम्हाला तुमच्या बचतीवर कोणतीही जोखीम किंवा धोका न घेता चांगला नफा आणि परतावा मिळवायचा असेल, तर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे हा एक योग्य पर्याय असेल. कारण सरकारी योजना हमखास योजना देतात आणि सुरक्षित असतात.

वाढत्या महागाईच्या काळात, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा हवा असेल तर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सरकारी योजना हमखास परतावा देतात आणि त्यातील पैसे बुडत नाही. जोखिमविरहित हमीपरताव्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला निश्चित कालावधीसाठी ठेवी ठेवायच्या असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी मुदत ठेवी ठेवून तुम्ही हमखास चांगला नफा मिळवू शकता.

मॅच्युरिटीला 13,94,067 रुपये मिळतील :
पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर तुम्हाला वार्षिक 6.7 टक्के व्याज दिला जाईल. मुदत ठेवी वर व्याज परतावा दरवर्षी दिले जाते परंतु त्याची गणना ही तिमाही आधारावर केली जाते. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी एकरकमी 10 लाख रुपये गुंतवल्यास, योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 13,94,067 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला मिळणारा व्याज परतावा 3,94,067 रुपये असेल. पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुमच्या 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल.

किमान गुंतवणूक 1000 रुपये :
पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेमध्ये किमान 1,000 रुपये जमा करून तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर तुम्ही 100 रुपयांच्या पटीत तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना खाते अनुक्रमे 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे किंवा 5 वर्षांसाठी उघडता येईल. सध्या या योजनेत मॅच्युरिटीवर 5.5 टक्के वार्षिक व्याज परतावा दिला जाईल.

या योजनेत एक प्रौढ किंवा जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन एक संयुक्त खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक, मानसिक रित्या कमकुवत व्यक्तीच्या वतीने पालक आणि 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावावर खाते उघडून गुंतवणूक सुरू करू शकतात. पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती मॅच्युरिटीनंतर पुढील कालावधीसाठीही ती योजना वाढवून घेऊ शकतात. ज्या कालावधीसाठी खाते उघडले होते त्याच कालावधीत हा कालावधी वाढेल. समजा जर तुमची 3 वर्ष कालावधी साठी मुदत ठेव योजना खाते उघडले आहे, तर तुम्ही पुढील 3 वर्ष कालावधी साठी हि योजना वाढवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post office investment schemes Time deposit for long term to earn huge returns on 11 April 2023.

हॅशटॅग्स

#Post Office Investments(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x