16 April 2025 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Post Office Saving | पोस्ट ऑफिसची ही योजना गुंतवणुकीचे पैसे दुप्पट करते, सरकारी हमीने पैसा वाढतो, किती गुंतवणूक करू शकता पहा

Post Office Saving,

Post Office Saving | पोस्ट ऑफीस आपल्या ग्राहकांसाठी अल्पबचत योजना राबवत असते, यापैकी एक सर्वात जास्त परतावा मिळवून देणारी योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. जर तुम्ही कमी जोखीम घेऊन जास्त परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC ही तुमच्या साठी फायदेशीर ठरू शकते. या अल्प बचत योजनेत भारत सरकार परताव्याची हमी देते. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमाल 1.5 लाख रुपये पर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सुट दिली जाईल. NSC ही एक सरकारी गुंतवणूक योजना असल्यामुळे तुमचे पैसे यात सुरक्षित राहतील आणि ते निश्चित व्याज दरानुसार वाढत राहतील.

NSC वर मिळणारा व्याज परतावा :
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.8 टक्के प्रमाणे परतावा दिला जाईल. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. NSC आणि इतर अल्पबचत योजनेचे व्याजदर भारत सरकार दर तिमाहीत पुनरावलोकन करत असते, आणि कमी किंवा जास्त असे बदल करते.

NSC व्याजातून किती पैसे मिळू शकतात?
NSC योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जाईल. परंतु व्याज किमान 5 वर्षांच्या मॅच्युरिटीवरच तुमच्या खात्यात जमा केले जाईल. जर एखादा गुंतवणुकदार या योजनेत 5 लाख रुपये एकरकमी जमा करतो, तर त्याला 6.8 टक्के व्याज दराने योजनेच्या मॅच्युरिटीवर 6,94,746 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच तुम्हाला पाच लाख रुपये गुंतवणूक केल्यास 1,94,746 रुपये व्याज परतावा मिळेल.

NSC योजनेत गुंतवणूक मर्यादा :
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नजीकच्या कोणत्याही शाखेत जाऊन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये किंवा 10,000 रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. या योजनेत गुंतवणुक करण्यासाठी तुम्हाला किमान 100 रुपये जमा करावे लागेल. कमाल गुंतवणूक रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

NSC योजनेत गुंतवणुकीचे फायदे :
पोस्ट ऑफीसच्या NSC योजनेत गुंतवलेल्या 1.50 लाख रुपये पर्यंतच्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ उपलब्ध असेल. मुदत ठेवीच्या तुलनेत योजनेत गुंतवणुक केल्यास जास्त व्याज परतावा मिळतो. NSC ही एक सरकारी योजना असल्याने तुमची गुंतवणूक रक्कम सुरक्षित राहण्याची आणि हमखास परतावा मिळण्याची हमी भारत सरकार देते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office National saving Scheme for long term investment for high returns on 08 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post Office Saving(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या