23 November 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News

Post Office RD

Post Office RD | तुम्ही आतापर्यंत पोस्टाच्या अनेक स्मॉल सेविंग योजनांबद्दल माहिती घेतली असेल. अनेकांनी स्मॉल सेविंग इन्व्हेस्टमेंट देखील केली असेल. स्मॉल सेविंग इन्व्हेस्टमेंटमधून गुंतवणूकदाराला विविध फायद्यांचा लाभ अनुभवता येतो. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच पोस्टाची आरडी या योजनेची पुरेपूर माहिती देणार आहोत.

प्रत्येक व्यक्तीला योजनांमध्ये गुंतवणूक करून लखपती बनायचं असतं. परंतु अनेकांना असं वाटतं की, लखपती बनण्यासाठी आपल्याला भरघोस रक्कम गुंतवावी लागेल. परंतु असं काहीही नाही तुम्ही तुमच्या बजेटनुसार देखील गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या आरडीमध्ये केवळ 5000 हजार रुपयांची गुंतवणूक लाखोंच्या घरात पैसे कसे कमवायचे हे जाणून घेऊ.

पोस्टाची आरडी देते आधीपेक्षा जास्त व्याज :

पोस्ट ऑफिसने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वयोगटातील व्यक्तींसाठी त्याचबरोबर खास करून महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. यामधील पोस्टाच्या आरडी योजनेचे व्याजदर वाढवून मिळाल्यामुळे अनेक गुंतवणूकदार आनंदात आहेत. पोस्टाची आरडी गुंतवणूकदारांना 6.5% दराने व्याजदर देत होती परंतु आता दोन टक्क्यांनी वाढवून म्हणजे 6.7% व्याज दिले जाते. हा बदल मागील वर्षी 2023 पासून सुरू करण्यात आला आहे.

पोस्टाच्या आरडी योजनेत प्री-मॅच्युअर क्लोजरसह मिळते लोन सुविधा :

पोस्टाची आरडी योजना तुम्हाला प्री-मेचुरल क्लोजरची सुविधा देते. म्हणजेच तुम्हाला योजनेचा मॅच्युरिटी काळ पूर्ण होण्याआधीच तुमचं खातं बंद करता येऊ शकतं. दरम्यान तुम्हाला लोनची सुविधा देखील देण्यात येते. तुम्हाला लोन हवं असेल तर, गुंतवणुकीच्या एक वर्षानंतर 50 टक्क्यांपर्यंतच लोन मिळू शकते.

10 वर्षांत 8 लाखांपेक्षा अधिक फंड तयार होईल :

एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवले तर, योजनेच्या मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच 5 वर्षांत गुंतवणूकदाराच्या खात्यात 3,00,000 लाखांची रक्कम तयार होईल. योजनेच्या व्याजदराप्रमाणे म्हणजे 6.7 टक्क्याने तुम्हाला व्याजाचे 56,830 रुपये मिळतील. म्हणजेच तुमच्या खात्यात एकूण रक्कम 3,56,830 रुपये जमा होईल.

समजा त्या गुंतवणूकदाराने आणखीन 5 वर्षांसाठी खात पुढे सुरू ठेवलं तर, कॅल्क्युलेशन प्रमाणे आणि व्याजदराप्रमाणे त्याच्या खात्यात 10 वर्षांत 8,54,272 रुपये जमा होतील.

महत्त्वाचं :

पोस्टाच्या RD योजनेच्या व्याजदरावर TDS देखील कापला जातो. या टीडीएसचे पैसे गुंतवणूकदाराला आयटीआर क्लेम केल्यानंतर इन्कम द्वारे परत केले जाते. त्याचबरोबर आरडीवर लागू होणारे व्याज 10% दराने लावले जाते. म्हणजेच योजनेवर तुम्हाला मिळणारं व्याज 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर हमखास TDS कापला जातो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office RD 23 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office RD(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x