Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या
Post Office Scheme| गुंतवणूक बाजारात कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत जोखीम तर असतेच. अशा परिस्थितीत, तुम्ही योग्य ठिकाणी आपले पैसे गुंतवावे जेणे करून तुम्ही त्यातून सुरक्षित परतावा कमवू शकता, आणि तुमची गुंतवणुकही सुरक्षित राहील. तथापि, इक्विटी मार्केटमध्ये जोखीम जास्त असते, मात्र इतर गुंतवणूक पर्यायापेक्षा परतावा देखील खूप जास्त असतो. प्रत्येकाची गुंतवणुकीत आर्थिक जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक योजना हवी असेल तर आम्ही या लेखात तुम्हाला एका पोस्ट ऑफिस स्कीम बद्दल माहिती देणार आहोत.
इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना राबवत असते. त्यात अनेक अल्पबचत योजनाही समावेश होतो. कमी जोखीम असलेली गुंतवणूक म्हणून पोस्ट ऑफिस च्या अल्पबचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय असू शकतो. या गुंतवणुकीत जोखीम फार कमी असून परतावाही भरघोस मिळतो. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना हा एक गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे.
पोस्ट ऑफिस RD स्कीम :
पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट योजना ही एक अल्पबचत योजना असून यामध्ये चांगल्या व्याजदरासह लहान हप्ते भरून तुम्ही परतावा कमवू शकता. ह्या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित राहतील कारण ही एक नॉन लिंक्ड योजना आहे. बाजारातील चढ उताराचा या योजनेवर कोणताही परिणाम होत नाही. या योजनेमध्ये तुम्ही फक्त 100 रुपये पासून गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे या योजनेत दर महिन्याला जमा करू शकता.
कालावधी आणि परतावा :
पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट योजनेचे खाते पाच वर्ष कालावधीसाठी उघडता येते. तथापि, बँका तुम्हाला सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठीही आवर्ती ठेव खाते उघडण्याची मुभा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत व्याज गणना केली जाते, आणि ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेत तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो.
परतावा व्याजदर :
सध्या, पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणुकीवर 5.8 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज देते. 5.8 टक्के व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व अल्पबचत योजनांचे व्याजदर ठरवत असते.
10 हजारवर कमवा 16 लाख :
जर एखादा गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या RD स्कीम मध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये जमा करत असेल तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8. टक्के चक्रवाढ व्याज दराने 16 लाख रुपयांपेक्षा अधिक परतावा मिळेल.
आकडेवारी नुसार समजून घ्या :
* दरमहा गुंतवणूक : 10,000 रुपये
* चक्रवाढ पद्धतीने व्याज : 5.8 टक्के
* मॅच्युरिटी कालावधी : 10 वर्षे
* 10 वर्षांनंतर मिळणारी मॅच्युरिटी रक्कम:16,28,963
Recurring deposit बद्दल महत्त्वाच्या गोष्टी :
जेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेत RD स्कीम सुरू केली तर तूम्हाला या योजनेत नियमितपणे पैसे जमा करावे लागतील. जर एखाद्या महिन्यात तुम्ही पैसे जमा करू शकला नाहीत तर तुम्हाला त्यावर 1 टक्का दंड शुल्क आकारला जाईल. जर तुम्ही सलग 4 महिने हप्ते चुकवले तर तुमचे खाते बंद केले जाईल.
पोस्ट ऑफिस RD वर आयकर :
पोस्ट ऑफीसच्या आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणुकीवर TDS कापला जातो. जर तुमची ठेव रक्कम 40,000 रुपयेपेक्षा अधिक असेल तर 10 टक्के प्रतिवर्ष या दराने आयकर आकारला जाईल. RD स्कीमवर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जाणार नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते FD प्रमाणेच फॉर्म 15G भरून TDS सवलतीचा दावा करू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Post Office Recurring Deposit scheme Benefits and Returns on investment on 28 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER