22 November 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं

Post Office Saving Scheme

Post Office Saving Scheme | बरेच ज्येष्ठ नागरिक पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून स्वतःचा फायदा करून घेतात. कारण की पोस्टाच्या गुंतवणूक योजनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आणि कर माफी दिली जाते.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2025 च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्ही आत्तापासूनच गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला कलम 80C अंतर्गत कोणकोणत्या योजनांमध्ये कर सवलत आहे किंवा टॅक्स फ्री आहे हे जाणून घेण्यास वेळ देखील मिळेल आणि गुंतवणूक करण्यास योग्य योजना देखील सापडेल.

1) पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड :
पीपीएफ म्हणजेचं पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड. या फंडामार्फत तुम्ही कर सवलतीचा फायदा मिळवू शकता. या फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्टातून किंवा बँकेमध्ये जाऊन खातं उघडू शकता. त्याचबरोबर या योजनेच्या नियमानुसार तुम्ही हजार रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर या खात्यात तुम्हाला दीड लाखांच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत प्राप्त होईल. पोस्टाकडून या योजनेमध्ये 7% व्याजदराने व्याज लावले जाते.

2) नॅशनल सेविंग सर्टिफिकेट :
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही देखील एक नावाजलेली योजना आहे. यामध्ये आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी गुंतवणूक करून कर सवलतीचा फायदा अनुभवला आहे. यामध्ये कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते आणि योजनेमध्ये व्याजदर 7% यादराने दिले जाते.

3) सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजना ही केवळ महिलांसाठी तयार केली गेलेली योजना आहे. या योजनेमध्ये 8% दराने व्याजदर दिले जाते. त्याचबरोबर तुम्ही या योजनेत 9 वर्षाच्या मुलीचं अकाउंट देखील उघडू शकता. ही योजना खास करून स्त्रियांना आत्मनिर्भर करण्यासाठी तयार केली गेली आहे.

4) सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम :
सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना देखील पोस्टाच्या आतापर्यंतच्या नावाजलेल्या योजनांपैकी एक आहे. या योजनेच्या नावावरूनच कळतंय की, ही योजना केवळ ज्येष्ठ व्यक्तींसाठी त्याचबरोबर नुकतेच सेवानिवृत्ती होऊन पैसे गुंतवण्यासाठी योग्य योजना शोधणाऱ्यांसाठी आहे. योजनेमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाचे वय 60 वर्ष किंवा त्यापुढे असणे गरजेचे आहे. दरम्यान या योजनेमध्ये 8.2% दराने व्याजदर प्रदान केले जाते आणि कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलतीचा लाभ देखील मिळतो. हा लाभ 1.50 लाखांच्या गुंतवणुकीवरच मिळतो. त्याचबरोबर या योजनेत तुम्ही 1000 ते 30 लाखांची रक्कम गुंतवू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Saving Scheme 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Saving Scheme(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x