19 December 2024 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या Post Office Saving | बँकांपेक्षा पोस्टात सेविंग अकाउंट उघडण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का, इथे घ्या योग्य माहिती RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, आयपीओ डिटेल्स नोट करा - GMP IPO HAL Share Price | डिफेन्स HAL कंपनी शेअरसहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL SIP Crorepati Formula | 'या' फॉर्म्युलाच्या मदतीने जो व्यक्ती SIP करेल तो करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती
x

Post Office Saving | बँकांपेक्षा पोस्टात सेविंग अकाउंट उघडण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का, इथे घ्या योग्य माहिती

Post Office Saving

Post Office Saving | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती पगारातील काही रक्कम सेविंग करण्याकरिता बँकेमध्ये सेविंग अकाउंट उघडतो. सध्याच्या काळात तर प्रत्येक व्यक्तीचे सेविंग अकाउंट असणे अत्यंत गरजेचे आहे. सेविंग अकाउंटमार्फत तुम्हाला तुमच्या पैशांची बचत करता येते. परंतु तुम्ही पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटबद्दल कधी ऐकलं आहे का.

आज आम्ही या बातमीपत्रातून बँकेच्या सेविंग अकाउंट त्याचबरोबर पोस्टाच्या सेविंग अकाउंटबद्दल स्पष्टीकरण देणार आहोत. ग्राहकांसाठी पोस्टाचे सेविंग अकाउंट उत्तम ठरेल की, बँकेचे दोघांमधील अंतर जाणून घेऊया.

मिनिमम बॅलन्स अमाऊंट :

प्रत्येक सेविंग अकाउंटची एक मिनिमम लिमिट असते. इतर बँकांच्या सेविंग अकाउंटमधील मिनिमम बॅलेन्सची लिमिट 1000 किंवा 1,500 रुपयांपर्यंत पाहायला मिळते. परंतु पोस्टाचं सेविंग अकाउंट त्यामानाने तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण की यामध्ये मिनिमम बॅलन्सची अमाऊंट केवळ 500 रुपये आहे.

व्याजदराविषयी जाणून घ्या :

पोस्टाचे सेविंग अकाउंट बँकेतील सेविंग अकाउंटपेक्षा आणखीन एका कारणाने फायदेशीर ठरते. ते म्हणजे अकाउंटचे व्याजदर. तुम्हाला बँकेतील सेविंग अकाउंटच्या व्याजदरापेक्षा पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटमध्ये जास्त व्याजाचा फायदा अनुभवायला मिळतो. पोस्टाच्या सेविंग अकाउंटमध्ये 4% व्याजदर मिळते तर, बँकांमधून मिळणारे व्याजदर हे 3.5% ते 2.70 एवढे असते.

पोस्टाच्या सेविंग अकाउंटमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा लाभ जाणून घ्या :

1. पोस्टाच्या सेविंग अकाउंटमध्ये खातं उघडल्यानंतर ग्राहकाला विविध प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येतो.

2. ज्यामध्ये ई बँकिंग सेवा, एटीएम कार्ड, चेकबुक, आधार लिंकिंग यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ घेता येतो.

3. एवढेच नाही तर पोस्टाच्या सेविंग अकाउंटमधून ग्राहकांना मोबाईल बँकिंगची सुविधा देखील अनुभवायला मिळते. या सर्व सुविधा तुम्हाला बँकेच्या सेविंग अकाउंटमध्ये त्याचबरोबर पोस्टाच्या देखील सेविंग अकाउंटमध्ये पाहायला मिळते.

4. पोस्टाच्या योजना सरकारी योजना असतात. त्यामुळे तुम्हाला सुरक्षितता पूर्णपणे मिळेल याची खात्री करून घ्यावी.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Saving Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post Office Saving(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x