14 January 2025 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
x

Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • योजनेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी करा या गोष्टी :
  • दिलेल्या व्याजदरानुसार पुढील कॅल्क्युलेशन पहा :
  • महिलांसाठी ही सुविधा देखील देण्यात आली आहे :
Post Office Scheme

Post Office Scheme | महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत सरकारने महिलांसाठीच्या विविध योजना राबवून अनेक महिलांना आर्थिक मदत केलेली आहे.

आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामधून तुमची आई, मुलगी आणि पत्नी म्हणजेच घरातील कोणतीही महिला केवळ 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर तब्बल 32,000 हजारांहून जास्त रक्कम व्याजाची कमवू शकते. या योजनेचे नाव आहे ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना’.

या योजनेचा तुम्ही केवळ दोन वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. त्याचबरोबर ही योजना 7.5 % व्याजदराने व्याज प्रदान करते. व्याजाची टक्केवारी जास्त असल्याने महिलांना याचा जास्त लाभ घेता येतो. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये तुम्ही 2025 वर्षापर्यंतचा गुंतवणूक करू शकता.

योजनेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी करा या गोष्टी :

MSSC महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेची खास गोष्ट म्हणजे, खातं उघडण्यासाठी कोणत्याही महिलेला वयाची अट नाही आहे. अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वजणी या योजनेचे पात्र आहेत. समजा तुमच्या घरातील एखाद्या महिलेला महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेचा भाग व्हायचं असेल आणि 2 वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक करून मालामाल व्हायचं असेल तर, सर्वप्रथम तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या नावाने खातं उघडून घ्या. त्यानंतर तुमचं केवायसी व्हेरिफिकेशन करून घ्या. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे दोन फोटोज यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांशी गरज भासेल.

दिलेल्या व्याजदरानुसार पुढील कॅल्क्युलेशन पहा :

1) दिलेल्या व्याजदरानुसार आणि नियमानुसार तुम्ही 7.5 % ने दोन वर्षांमध्ये 2,00,000 लाख रुपयांएवढी रक्कम महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये गुंतवत असाल तर तुम्हाला व्याजाची रक्कम 32,044 एवढी मिळेल. म्हणजेच दोन वर्षानंतर तुम्हाला मिळणारी मॅच्युरिटी रक्कम 2,32,044 रुपये एवढी असेल.

2) त्याचबरोबर एखादी महिला MSSC या योजनेमध्ये 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करत असेल तर, व्याजाची रक्कम 24,033 रुपये मिळेल. म्हणजे मॅच्युरिटीनंतर 1,74,033 एवढे रुपये मिळतील.

3) समजा तुम्ही 1,00,000 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, दिलेल्या व्याजदरानुसार मॅच्युरिटी टाईमवर 1,16,022 एवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

महिलांसाठी ही सुविधा देखील देण्यात आली आहे :

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये अंशिक निकासी म्हणजेच तुम्ही 1 वर्ष होऊन गेल्यानंतर अंशिक रक्कम मॅच्युरिटी पिरियड पूर्ण होण्याआधीच काढून घेऊ शकता. रक्कम काढतीसाठी 40% ची मर्यादा देण्यात आली आहे. म्हणजे समजा तुम्ही 2 लाखांची रक्कम योजनेमध्ये गुंतवली असेल तर, दिलेल्या टक्क्यांनुसार 80,000 रुपये तुम्ही काढून घेऊ शकता.

Latest Marathi News | Post Office Scheme 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(213)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x