13 January 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
x

Post Office Scheme | महिन्याचा खर्च भागेल, पोस्टाची जबरदस्त योजना; मिळतील प्रत्येक महिन्याला 9,250 रुपये - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी योग्य व्याजदराच्या योजना शोधत असतात. गुंतवणुकीसाठी आणि चांगल्या व्याजदराचा अनुभव घेण्यासाठी पोस्टाच्या सर्वच योजना अत्यंत फायदेशीर आहेत. यामधील POMIS म्हणजेच ‘पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्किम’ तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात प्रदान करू शकते. चला तर जाणून घेऊया पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीमविषयी.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमचे काही नियम जाणून घ्या :

1. पोस्टाच्या मधली इन्कम स्कीम योजनेमध्ये खातं उघडण्यासाठी तुम्ही केवळ 1000 रुपयांपासून सुरुवात करू शकता.
2. योजनेत जॉईंट खाते देखील उघडता येते. जॉईंट खात्यात तुम्हाला 15 लाख रुपयांची रक्कम गुंतवावी लागेल. त्याचबरोबर एकल खात्यात गुंतवणुकीची रक्कम 9 लाख रुपये दिली आहे.
3. पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेत तुम्हाला एक रक्कमी रक्कम गुंतवावी लागते. जेणेकरून ठराविक काळानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक अमाऊंट मिळत राहते.
4. गुंतवणूकदाराने गुंतवलेला पैशांवर वार्षिक आधारावर व्याज मिळत राहील. समजा एखाद्या व्यक्तीने गुंतवलेले पैसे काढले नाहीत तर, मुद्दल आणि व्याजाचा लाभ अनुभवता येईल.
5. योजनेचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे म्हणजे तुम्ही 5 वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत पैसे गुंतवू शकता. ज्या व्यक्तीला पुढे आणखीन गुंतवणूक करायची असेल तो योजना वाढवून देखील घेऊ शकतो.
6. योजनेच्या व्याजदराविषयी सांगायचे झाले तर, प्रत्येक वर्षाला 7.4% दराने वार्षिक व्याजदर मिळते. यामधील मासिक व्याजदर 5,550 रुपये असतात तर, वार्षिक व्याजदर 66,600 रुपये असतात.

खातं उघडण्यास कोण असेल पात्र :

1. एकल खाता उघडण्यासाठी भारतातील कोणताही प्रौढ व्यक्ती हे खातं उघडण्यास पात्र आहे.
2. संयुक्त म्हणजेच जॉइंट खाते उघडण्यासाठी कमीत कमी 3 प्रौढ व्यक्ती एकत्र येणे गरजेचे आहे.
3. तुम्ही या योजनेत मुलांच्या नावे देखील खातं उघडू शकता. अल्पवयीन मुलांचे खाते त्यांचे पालक उघडू शकतात.
4. समजा तुमच्या पाल्याला 10 वर्षे पूर्ण झाले असतील तर, तुम्ही गुंतवणूक करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(212)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x