21 April 2025 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

Post Office Scheme | सलग 5 वर्षांपर्यंत मिळवा महिना 9,250 रुपये पेन्शन, अधिक लाभ घेण्यासाठी काय करावे पहा - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये किती टक्के व्याजदर दिले जाते :
  • या योजनेमध्ये कोण कोण खातं उघडू शकत :
  • आणखीन पाच वर्ष कमाई करण्यासाठी हा सोपा उपाय करा :
Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्टांतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना योजनांचा लाभ घेता यावा त्याचबरोबर स्वतःचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी पोस्टाने विविध योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. पोस्टाच्या अनेक योजनांमध्ये ज्येष्ठांना जास्तीचा लाभ देखील मिळतो.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही योजना देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 9,250 रुपयांची कमाई करू शकता. त्याचबरोबर एखाद्या नागरिकाला ही योजना पाच वर्षांपुढे देखील सुरू ठेवायची असेल तर, त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आज आम्ही सांगणार आहोत.

पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये किती टक्के व्याजदर दिले जाते :
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये वर्षाला 7.4% व्याजदर प्रदान केले जाते. समजा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 9,00,000 लाखांची गुंतवणूक केली तर, दिल्या गेलेल्या व्याजदरानुसार तुम्हाला 5,550 रुपये मिळतील. ही रक्कम तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळू शकते. पोस्टाने या योजनेमध्ये इतर योजनांपेक्षा जास्तीचे व्याजदर दिले आहेत त्यामुळे केवळ व्याजदरानेच तुम्ही जास्तीची कमाई देखील करू शकता.

या योजनेमध्ये कोण कोण खातं उघडू शकत :
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम योजनेमध्ये तुम्ही तुमचं स्वतंत्र अकाउंट उघडू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पत्नीसह जॉईंट खातं उघडायचं असेल तर तुम्ही जॉईंट खातं उघडू शकता. स्वतंत्र खात्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 9,00,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर, जॉईंट खात्यामध्ये दोन सदस्य असल्यामुळे जमा केली जाणारी रक्कम 15,00,000 लाख रुपयांइतकी असायला हवी. त्याचबरोबर पोस्टाच्या मधली इनकम स्कीममध्ये 10 वर्षांच्या लहान मुलांसह कोणीही खातं उघडू शकतं.

दहा वर्षाखालील बालकांचे आई वडील त्यांच्या वतीने खातं उघडू शकतात. एवढंच नाही तर या योजनेत खातं उघडण्यासाठी तुमचा पोस्टामध्ये सेविंग अकाउंट असणे गरजेचे आहे. यामध्ये तुमच्याकडून आयडी प्रूफ म्हणून पॅन कार्ड किंवा आधार कार्ड मागण्यात येईल.

आणखीन पाच वर्ष कमाई करण्यासाठी हा सोपा उपाय करा :
ही योजना केवळ 5 वर्षांकरिता बनवली गेली आहे. त्याचबरोबर ही योजना एक्सटेंड करण्यासाठी वेगळे असे कोणतेच नियम दिले गेले नाहीत. तरीसुद्धा तुम्हाला ही योजना आणखीन पाच वर्षांसाठी पुढे सुरू ठेवायची असेल तर, तुमच्या आधीच्या योजनेचा मॅच्युरिटी टाईम संपल्यानंतर संपूर्ण रक्कम काढून घेऊन तुम्ही आणखीन पाच वर्षांसाठी दुसरा नवीन खातं उघडू शकता आणि त्यामध्ये सर्व पैसे डिपॉझिट करू शकता. जेणेकरून आणखीन पाच वर्ष तुम्हाला पेन्शन प्राप्ती होईल.

Latest Marathi News | Post Office Scheme 04 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या