22 November 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी

Post Office Scheme

Post Office Scheme | सरकारमार्फत पोस्टाकडून सर्वसामान्यांसाठी खास करून मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना राबवल्या जातात. तुमच्यापैकी देखील अनेकजण पोस्टाच्या योजनेचा लाभ घेत असतील.

पोस्टाने खास तुमच्या आई, बायको, बहिण आणि मुलगी सर्व महिला प्रवर्गासाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट असे आहे. ती योजना दोन वर्षांची असून यामध्ये तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता. दरम्यान ही योजना 2025 पर्यंत सुरू असून सध्याच्या घडीला 7.5% ने व्याजदर प्रदान करत आहे.

मिळते चक्रवाढ व्याज :
महिलांसाठी पोस्टाची ही योजना अत्यंत खास असून त्यांना चक्रवाढ व्याज देखील उपलब्ध होते. समजा एखाद्या महिलेने योजनेमध्ये 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, त्यांना मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर एकूण रक्कम 2,32,044 रुपये मिळतील. यामधील व्याजाची एकूण रक्कम 32,044 रुपये एवढी असेल.

ही सुविधा देखील मिळते :
समजा एखाद्या महिलेने महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल. ती गुंतवणूक नक्कीच दोन वर्षांसाठी असेल. तर, दोन वर्षांच्याआधीच म्हणजे गुंतवणुकीनंतरच्या एका वर्षात महिलेला पैसे काढायचे असतील तर, ती 40% रक्कम काढून घेऊ शकते. त्यामुळे या योजनेमध्ये तुम्हाला पूर्णपणे सुरक्षा आणि शंभर टक्के गॅरंटी रिटर्न मिळवून देण्याची क्षमता आहे.

उघडू शकता एकापेक्षा अनेक खाते :
महिलांच्या या योजनेमध्ये कोणतीही महिला एकापेक्षा अनेक खाते उघडू शकते. एक खात उघडलेलं असताना दुसरं खातं उघडायचं असेल तर, एका खात्याला तीन महिने उलटून गेल्यानंतरच दुसरं खातं उघडण्यासाठी मुभा मिळते.

मिळतो टॅक्स सूटचा फायदा :
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये प्रत्येक महिलेला टॅक्स कर सवलतीचा फायदा देखील अनुभवता येतो. हा फायदा कलम 80C अंतर्गत घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर या योजनेमध्ये लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वजणी खातं उघडू शकतात. सोबतच आयकर विभागातून सूट मिळत असली तरीही जमा असलेल्या रकमेच्या व्याजावर कर भरावा लागू शकतो. त्या व्याजावर टीडीएस कापला जातो.

गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाल्यावर काय करावे :
समजा एखाद्या महिलेने योजनेमध्ये पैसे गुंतवले आहेत आणि मॅच्युरिटी पिरियडच्या आधीच तिचा मृत्यू झाला तर, जमा केलेले सर्व पैसे तिने केलेल्या नॉमिनीला मिळतील. त्याचबरोबर हयात असतानाच योजनेच्या टाईम पिरियडआधीच खात बंद करायचं असेल तर, तुम्हाला थोडेफार नुकसान सहन करावे लागू शकते. यामध्ये तुम्हाला 7.5% ने नाहीतर 5.5% ने व्याजदर दिले जाईल.

तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही बँकेत किंवा तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटचा फॉर्म भरू शकता. फॉर्मसाठी तुमच्याकडून काही कागदपत्रांची मागणी केली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल. योजना संपेपर्यंत तुम्हाला हे सर्टिफिकेट जपून ठेवायचं आहे. जास्तीत जास्त व्याजाचा लाभ घेण्यासाठी कोणतीही महिला या स्मॉल सेविंग योजनेमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ मिळू शकते.

Latest Marathi News | Post Office Scheme 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x