23 February 2025 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

Post Office Scheme | तुमच्या मुलींसाठी फायद्याची स्कीम; 10 हजार गुंतवा आणि 37 लाख रुपये मिळवा, फायदा घ्या - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत महिलांसाठी अनेक स्कीम राबवल्या जातात. बऱ्याच महिला स्त्री सशक्तीकरणासाठीच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेताना दिसतात. अशाच पद्धतीची खास मुलींसाठी असलेली ‘सुकन्या समृद्धी योजना’ ही स्कीम तुमच्या फायद्याची ठरू शकेल. केंद्र सरकारने 2015 साली ही योजना सुरू केली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाअंतर्गत ही योजना चालली जाते. दरम्यान या योजनेमध्ये किती पैसे गुंतवावे लागतात? गुंतवलेला पैशांचा आपल्या ला किती टक्के व्याजदर मिळतो? या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही सांगणार आहोत.

‘सुकन्या समृद्धी योजनेचा’ उद्देश :
या स्कीमचा उद्देश म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामधील मुलींना हक्काचं शिक्षण, उच्च शिक्षणासाठी लागणारी पैशांची गरज त्यानंतर लग्नासाठी होणारा खर्च. या सर्व गोष्टी पाहता ही योजना तुम्हाला चांगला लाभ मिळवून देऊ शकते. म्हणजेच काय तर प्रत्येक मुलगी स्वबळावर स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकेल याच उद्देशाने ‘सुकन्या समृद्धी योजना’ राबविली जात आहे.

टॅक्स सूट :
या योजनेमध्ये तुम्हाला आयकर अधिनियम 1961 कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील दिला जातो. या योजनेमध्ये तुम्ही दहा वर्षांपर्यंतच्या मुलींचं खातं उघडू शकता. जास्तीत जास्त दीड लाख तर कमीत कमी 250 रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. गुंतवणुकीसाठी जास्तीच्या अटी दिल्या गेल्या नाही आहेत. परंतु तुम्ही वर्षाला दीड लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही.

1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन :
तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी मुलीच्या 21व्या वर्षी पूर्ण होणार. अशातच तुम्ही प्रत्येक वर्षाला 1.5 लाखांची गुंतवणूक करत असाल तर 21 वर्षानंतर ही अमाऊंट 69.8 लाख रुपये इतकी होईल. म्हणजेच या मधली फक्त व्याजाचीच रक्कम 47.3 लाख रुपयांपर्यंत मिळेल. या योजनेच्या फायद्यामुळे तुम्हाला बक्कळ पैसे कमवता येतील. या पैशांमधून तुमच्या मुलीचा सर्व काही खर्च आरामात भागू शकेल. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ हा पर्याय उत्तम आहे.

10 हजारांच्या गुंतवणुकीवर होईल 37 लाखांचा फायदा :
या योजनेसाठी सरकार तिमाही पद्धतीने व्याजदर ठरवतात. म्हणजेच 1 जुलै 2024 पासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत कंपाउंड इंटरेस्ट 8.2% टक्क्यांपर्यंत निर्धारित केला गेला आहे. त्यामुळे वेळेअभावी तुमच्या खात्यात गुंतवणुकीची रक्कम चांगली वाढली गेली पाहिजे. तुमच्या पाच वर्षाच्या मुलीसाठी प्रत्येक वर्षाला 1.2 लाख रुपयांपर्यंत पैसे खात्यामध्ये गुंतवत असाल तर, महिन्याच्या हिशोबाने तुम्ही दरमहा 10,000 रुपये खात्यामध्ये जमा करत असाल. 21 व्या वर्षी स्कीम मॅच्युअर झाल्यानंतर तुमच्या खात्यात 55.61 एवढी रक्कम जमा होईल. यामधील 17.93 गुंतवणुकीचे आणि मिळालेला व्याज 37.68 एवढा असेल. म्हणजेच ही योजना तुम्हाला मालामाल बनवू शकते.

तुम्हाला सुद्धा या योजनेचा भाग व्हायचं असेल तर, तुमच्या शहराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडू शकत. त्याचबरोबर तुम्ही तुमचं खातं भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमधील अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता.

Latest Marathi News | Post Office Scheme 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(225)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x