14 November 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC EPF Contribution Limit | पगारदारांसाठी आनंदाची बातमी; आता आधीपेक्षा जास्त बचत होईल, EPF ची अधिक रक्कम मिळणार Property Knowledge | मालमत्ता खरेदी करणे पडू शकते महागात, वेळीच सावध व्हा, 'या' गोष्टींमुळे सोपे होईल प्रॉपर्टीचे काम Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News
x

Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या वेतन मर्यादेनुसार पैशांची गुंतवणूक करत असतो. भविष्यासाठी आपण काहीतरी निधी जमा करून ठेवावा जेणेकरून वेळेप्रसंगी इतरांकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही त्याचबरोबर आपण लाचार होऊन बसणार नाही यासाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय सध्याच्या घडीला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

बऱ्याच गुंतवणूकदारांना असं वाटतं की, आपण जेव्हा मोठ्या रक्कमेची गुंतवणूक करतो तेव्हाच आपल्याजवळ लाखोंच्या घरामध्ये पैसा जमा होतो. परंतु असं अजिबात नाही तुम्ही छोटा बचतीपासून सुरुवात करून देखील लक्षाधिश होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या आरडी म्हणजेच रिपेरिंग डिपॉझिट या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. योजनेमध्ये तुम्ही केवळ 100 रुपयांपासून बचत सुरू करू शकता. पोस्टाची आरडी योजना पाच वर्षांसाठी असते. पाच वर्षांमध्ये तुम्ही लाखो रुपयांचा फंड तयार करून ठेवू शकता.

दिवसाला केवळ 100 रुपये वाचवा :

समजा तुम्ही प्रत्येक दिवसाला 100 रुपये वाचवत असाल तर, एका महिन्याला हे रक्कम 3000 रुपये एवढी होईल. म्हणजेच तुम्ही प्रत्येक महिन्याला 3000 हजार रुपये रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच पोस्टाच्या आरडी योजनेत गुंतवत असाल तर, वर्षालाही रक्कम 36000 होईल. पुढील 5 वर्षांत ही रक्कम 1,80,000 रुपये होईल. सध्याच्या घडीला या योजनेमध्ये 6.7% दराने व्याजदर दिले जात आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 5 वर्षांच्या हिशोबाने व्याजाची रक्कम34,097 रुपये असेल आणि मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम 2,14,097 रुपये असेल. म्हणजेच केवळ छोट्या गुंतवणुकीपासून देखील तुम्ही लखपती होऊ शकतात.

योजना देते लोन सुविधा :

पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये व्यक्ती गरजेवेळी लोनसाठी अप्लाय करू शकतो. समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेमध्ये एकूण 12 हप्ते जमा केले तर, त्याला 50% पर्यंत लोन दिले जाते. विशेष म्हणजे लोन परतफेडीसाठी तुम्ही हप्त्यातून किंवा एक रक्कमी रक्कम देखील देऊ शकता. त्याचबरोबर ही योजना तुम्हाला नोमिनी ठेवण्याची सुविधा देखील देते.

आरडी एक्सटेंड करू शकता :

पोस्टाच्या या आरडी योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षांची ही योजना एक्सटेंड करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला योजना आणखीन 5 वर्षांसाठी पुढे वाढवून हवी असेल तर, योग्य तरतुदी वापरून 5 वर्षयोजना आणखीन पुढे ढकलू शकता. तुम्हाला पुढील पाच वर्षांत तितकेच व्याज मिळणारे जितके व्याज खातो उघडल्यापासून सुरू झालं होतं. समजा तुम्ही एक्सटेंड अकाउंट उघडलं आणि दोन वर्ष 6 महिन्यानंतर बंद करून टाकलं तर, तुम्हाला 2 वर्षांचं 6.7% व्याज मिळेल. त्याचबरोबर पुढील 6 महिन्याचं 4% व्याज मिळेल.

मॅच्युरिटीआधी खात बंद करण्याचे नियम :

समजा तुम्हाला हे खातं 5 वर्षांआधीच बंद करायचं असेल तर, खातं उघडल्यापासून 3 वर्ष झाल्यानंतर बंद करू शकता. याला प्री-मॅच्युअर क्लोजर असं म्हणतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(185)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x