22 November 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Post Office Scheme | दिवाळीपासूनच सुरू करा गुंतवणूक, पोस्टाच्या 'या' खास योजनेमुळे व्हाल लखपती - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • पोस्टाच्या RD योजनेमध्ये अशा पद्धतीने उघडा खातं
  • या योजनेमध्ये चांगले व्याज दिले जाते
  • 1000, 3000 आणि 5,000 च्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन जाणून घ्या
Post Office Scheme

Post Office Scheme | लवकरच दिवाळी-दसरा हे सण सुरू होणार आहेत. या सणांच्या दिवशी अनेक व्यक्ती गोल्ड ज्वेलरीमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. कारण की, गोल्ड ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट करून त्यांना व्याजाची चांगली रक्कम मिळते. फक्त सोनंच नाही तर अनेक लोक जमिनी खरेदी करून देखील चांगला परतावा मिळवतात.

आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका भन्नाट योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना 5 वर्षांची असून तुम्ही फक्त 100 रुपये भरून खातं उघडू शकता. या योजनेचे नाव आहे ‘पोस्ट ऑफिस आरडी’ योजना. पोस्टाच्या आरडी योजनेबद्दल जाणून घ्या सविस्तर.

नोकरदार अथवा सेवानिवृत्त झालेल्या अनेक व्यक्ती गुंतवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत असतात. त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करून आपल्याला योग्य व्याजदर मिळेल याच्या शोधात देखील असतात. दरम्यान पोस्टाची आरडी योजना सर्व नोकरदारांसाठी फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवून तुम्ही तब्बल एक लाख रुपयांपर्यंत फंड जमा करू शकता.

पोस्टाच्या RD योजनेमध्ये अशा पद्धतीने उघडा खातं
पोस्टाच्या आरडी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आरडी स्कीमकरिता फॉर्म मागून तो व्यवस्थित भरावा लागेल. फॉर्म सबमिट करून झाल्यावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे कागदपत्र देखील लागणार आहेत. फॉर्मच्या दिल्या गेलेल्या सर्व तरतुदी पूर्ण करून तुम्ही पोस्टाच्या आरडी स्कीममध्ये स्वतःच्या नावाचं खातं उघडू शकता आणि गुंतवणूक सुरू करू शकता.

या योजनेमध्ये चांगले व्याज दिले जाते :
पोस्टाच्या आरडी स्कीमची विशेष गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला उत्तम व्याजदर दिले जाते. ही योजना 5 वर्षांची असून तुम्हाला वर्षाला 6.7%ने व्याजदर दिले जाते. ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता असते.

1000, 3000 आणि 5,000 च्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन जाणून घ्या :
पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये तुम्ही 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करत असाल आणि वर्षाला 6.7% व्याजदर लागू असेल तर, व्याजाच्या हिशोबाने तुमच्या खात्यामध्ये पाच वर्षानंतर 71,369 एवढे रुपये जमा होतात. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम 60,000 तर, व्याजाचे 11,369 एवढे रुपये मिळतील. त्याचबरोबर तुम्ही ही योजना आणखीन पाच वर्षांसाठी पुढे वाढवली तर, एकूण 10 वर्षांमध्ये तुमच्या खात्यात 1.70 लाख एवढी रक्कम जमा होईल. ज्यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक 1.20 तर व्याजाची रक्कम 50,857 एवढी असेल.

पोस्टाच्या आरडी योजनेत दिलेल्या व्यासदरानुसार 3,000 च्या गुंतवणुकीवर पाच वर्षांपर्यंत 1,80,000 एवढा फंड जमा होईल. यामधील व्याजाची रक्कम 34,097 असेल तर, पाच वर्षाची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 2,14,097 लाखांचे मानकरी व्हाल.

समजा तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेत 5,000 रुपये गुंतवणूक करत असाल तर, दिलेल्या व्याजदरानुसार तुमच्या खात्यात पाच वर्षांमध्ये 3.56 रक्कम जमा होईल. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे 3 लाख तर, व्याजाची रक्कम 56,830 रुपये एवढी असेल.

Latest Marathi News | Post Office Scheme 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x