28 November 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, जेफरीज ब्रोकरेजकडून BUY रेटिंग - SGX Nifty NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty Post Office Scheme | महिना खर्चाची चिंता नको, फायद्याची योजना, प्रत्येक महिन्याला 3083 रुपये मिळतील - Marathi News Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Railway Ticket Booking | ही एक ट्रिक वापरा आणि वृद्ध आई-वडिलांसाठी कन्फर्म लोअर सीट बुक करा, प्रवास सुखकर होईल
x

Post Office Scheme | महिना खर्चाची चिंता नको, फायद्याची योजना, प्रत्येक महिन्याला 3083 रुपये मिळतील - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | सध्याच्या घडीला गुंतवणूक क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढले आहे. बऱ्याच व्यक्ती आपले पैसे दुप्पटीने वाढवण्यासाठी म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणूक करतात. त्याचबरोबर अनेक व्यक्ती सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस योजनांचा पर्याय निवडतात. पोस्टाच्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करावी लागत नाही. अशीच एक पोस्टाची प्रत्येक महिन्याला पैसे मिळवून देणारी भन्नाट योजना आहे. जिचं नाव पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम MIS असं आहे.

पोस्टाच्या MIS योजनेविषयी जाणून घ्या :

पोस्टाच्या योजनांमधील व्याजदरात केंद्र सरकारकडून थोडाफार प्रमाणात वाढ केली जाते. पोस्टाची मंथली इनकम स्कीम या योजनेत देखील 1 एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे आणि म्हणूनच ही योजना मासिक उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी आणखीनच आकर्षक बनली आहे. ही योजना तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे मिळवून देण्याची हमी देते.

पोस्टाच्या मंथली इनकम योजनेबद्दल आणखीन माहिती जाणून घ्या :

1. पोस्टाच्या मधली इनकम योजनेविषयी काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्ही ते पैसे काढू देखील शकता परंतु यासाठी योजनेच्या 1 वर्षानंतरच पैसे काढू शकता. 1 ते 3 वर्ष झाले असल्यास तुम्ही पैसे काढू शकत नाही. जर तुम्ही पैसे काढले तर तुमच्याकडून 2% शुल्क आकारले जातील.

2. पोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला 7.4% या दरानुसार व्याज मिळते. त्याचबरोबर जास्तीत जास्त पैसे गुंतवणुकीची लिमिट 9 लाख रुपयांची दिली आहे आणि 1,000 रुपये गुंतवून तुम्ही युजनीला सुरुवात करू शकता.

3. एकल खात्यासाठी 9 लाख तर, जॉईंट खाते उघडण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची लिमिट 15 लाखांची दिली गेली आहे.

4. समजा एखाद्या व्यक्तीने संयुक्त किंवा एकल खातं उघडलं असेल तर, तो ते खातो बदलून देखील घेऊ शकतो. म्हणजेच सिंगल खातं संयुक्त आणि संयुक्त खात सिंगल करून घेऊ शकतो.

5. त्याचबरोबर गुंतवणुकीविषयी देखील जाणून घेऊया. समजा पोस्टाच्या या योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला इन्कम हवी असेल आणि त्याने 5 लाखांची रक्कम योजनेमध्ये गुंतवली असेल तर, या मासिक योजनेअंतर्गत गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला 3,083 हजार रुपये मिळतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x