19 April 2025 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Post Office Scheme | पोस्टाच्या योजनेचा ट्रिपल डोस; गुंतवा केवळ 333 रुपये आणि मिळवा 17 लाख रुपये, फायद्याची योजना

Post Office Scheme

Post Office Scheme | ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांकडे महागाईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच बऱ्याच सर्व सामान्य व्यक्तींना घर खर्च सांभाळून स्वतःच्या पगारातीलl काही रक्कम एका विशिष्ट ठिकाणी गुंतवणे ही काळाची गरज आहे. एकीकडे म्युच्युअल फंड तसेच एसआयपीमध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु बऱ्याच व्यक्तींना गुंतवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नको असते. अशा व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिस कायम सज्ज आहे.

तसं पाहायला गेलं तर पोस्टाच्या सर्वच योजना अतिशय भन्नाट आहेत. यामध्ये परताव्याची हमी त्याचबरोबर अतिरिक्त सुरक्षा मिळते. ज्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर केवळ निश्चित आणि ठरलेले व्याज मिळते. यामध्ये कोणत्याही प्रकारची गलत होताना पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच सर्वसामान्य प्रवर्गाचा पोस्टाच्या योजनांकडे अधिक कल पहायला मिळतो. अशीच एक पोस्टाची RD म्हणजेच ‘रीकरिंग डिपॉझिट’ नावाची योजना प्रचंड लोकप्रिय आहे. या योजनेतून तुम्ही दिवसाला 333 रुपये गुंतवून 17 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम कमावू शकता.

गुंतवणुकीच्या जोखीमेपासून लांब राहणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय :

पोस्टाची केवळ आरडीच नाही तर इतर सर्व योजना जोखीम मुक्त आहेत. त्यामुळे कोणताही नागरिक बेफिकीरपणे योजनेत गुंतवणूक करू शकतो. पोस्टाच्या आरडी योजनेच्या व्याजदर विषयी सांगायचे झाले तर, पोस्टाची RD तुम्हाला वार्षिक आधारावर 6.8% टक्के व्याज देते. ज्यामध्ये चक्रवाढ व्याजाचा देखील लाभ मिळतो. यामध्ये तुम्ही एकल तसेचं संयुक्त खाते उघडून अधिक नफा मिळवू शकता. त्याचबरोबर या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा दिल्या जातो. तुम्ही हवं तेव्हा गुंतवणूक वाढवू देखील शकता.

333 चे 17 लाख असे होतील तयार :

1. 333 रुपयांचे गणित अतिशय सोपे आहे. हे गणित असं की, तुम्हाला प्रत्येक दिवसाला 333 रुपये जमा करायचे आहेत. दररोज 333 रुपये म्हणजे महिन्याला 10,000 रुपये तयार होतात.

2. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक केली तर, वर्षाला खात्यामध्ये 1.20 लाखाची रक्कम तयार होते.

3. एकूण 5 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडमध्ये तुम्ही 5,99,400 रुपये जमा कराल. 6.8% व्याजदराप्रमाणे तुमच्या खात्यात एकूण रक्कम 7,14,827 जमा होईल यामधील व्याजाचे पैसे 1,15,472 रुपये एवढे असतील.

4. समजा 5 वर्षांच्या काळाचा अनुभव घेऊन तुम्हाला आणखीन 5 वर्ष म्हणजेच एकूण 10 वर्ष गुंतवणूक करायची असेल तर, तुम्हाला अधिकच लाभ मिळू शकतो. यामध्ये तुम्ही 10 वर्षांत एकूण 12 लाखांची रक्कम जमा कराल. या रक्कमेवर तुम्हाला 5,08,546 एवढे व्याज मिळेल. व्याजाची रक्कम जोडून आणि तुमच्या गुंतवणुकीची रक्कम जोडून 17,08,546 लाखोंचा फंड तयार होतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 29 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या