30 December 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

Post Office Scheme | कमी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पोस्टाच्या तीन नव्या बचत योजना फायद्याच्या, परतावा सुद्धा मोठा मिळेल

Post Office Scheme

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला आपल्या पुढील भविष्यासाठी पैशांची जमापुंजी करायची असते. यासाठी प्रत्येक नागरिक हा आपल्या कमाइतील काही रक्कम योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करत असतो. आपले पैसे आपण जिथे गुंतवणार आहोत ती जागा सुरक्षित असणे यासाठी फार महत्वाचे असते. अशात अणेक छोटे गुंतवणूकदार बचतगट किंवा फंड अशा ठिकाणी पैसे गुंतवत असतात. तसेच अनेक महिला वर्ग अगदी सोनाराच्या दुकानात देखील पैशांची गुंतवणूक करताना दिसतात. मात्र या गुंतवणूकीत सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह कायम असतो.

अशात आता छोट्या गुंतवणूकदारांचा विचार करत पोस्टाने तीन नवीन स्कीम आणल्या आहेत. या तिन्ही स्कीममध्ये कमितकमी गुंतवणूक करून अधिक नफा कमवता येईल. भारतातील प्रत्येक नागरिक पोस्टऑफिसवर विश्वास ठेवतो. अर्थातच पोस्ट ऑफिस शासन नियमांनुसार चालते. त्यामुळे इथे पैसे गुंतवणे सुरक्षित आहे. त्यामुळे आता जर तुम्हाला देखील छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरु करायाची असेल तर या तिन्ही योजना खास तुमच्यासाठी आहेत.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना :
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना ही अतीशय कमी गुंतवणूकीपासून सुरु होते. यात तुम्हाला दर महा फक्त १०० रुपये भरावे लागतील. या योजनेची मॅच्यूरिटी फक्त ५ वर्षांची आहे. तुमच्या गुंतवणूकीवर ही योजना तुम्हाला ५.८ टक्के व्याज देखील देते. तसेच जास्त गुंचवणूक करायची असल्यास त्यावर देखील कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्ही विश्वासाने घेऊ शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवणूकीसाठी १००० रुपयांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. यात ५ वर्षांची मॅच्यूरिटी देण्यात आली आहे. तसेच लॉक इन कालावधी देखील ५ वर्षांचा आहे. तुमच्या जमा झालेल्या रकमेवर तुम्हाला ६.८ टक्के रिटर्न निळते. तसेच आयकर सवलतीचा लाभ देखील या योजनेतून घेता येइल.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट :
बॅंकेतील फिक्स डिपॉझिट प्रमाणे ही योजना आहे. यात १ वार्षापासून ते ५ वर्षांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. १ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवीवर तुम्हाला ५.५ टक्के कॅश बॅक आहे. तसेच व्याज ६.७ टक्के देण्यात आले आहे. तसेच यातील गुमतवणूकीवर आयकर सुट देखील आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक करणा-यांसाठी देखील ही योजना फायदेशीर राहिल. यात तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरु करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title | Post Office Scheme 3 New Post Savings Schemes for Low Investors check details 14 October 2022.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x