Post Office Scheme | गुंतवणुकीवर दर महिन्याला पैसे हवे असल्यास पोस्ट ऑफिसची ही स्किम महिन्याला 2500 रुपये देईल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या स्किममधून महिन्या मिळतील २५०० रुपये भारतात कमी पण सुरक्षित गुंतवणूक हवी असलेला मोठा मध्यम वर्ग आहे. यात व्यक्ती त्यांच्या सोइनुसार गुंतवणूक करतात. त्यामुळे यात कमी गुंतवणूक करून कमी जेमतेम नफा मिळाल्यास देखील ते समाधानी असतात. अशात पोस्ट ऑफिसमध्ये खुप कमी पैशांच्या गुंतवणूकीचा देखील पर्याय आहे. त्यामुळे याला अनेकांची पसंती आहे. नुकतेच शासनाने पोस्ट ऑफिस नॅशनल मंथली इन्कम अकाउंट (MIS) बरोबर लहान बचत योजनांसाठी दर जाहीर केलेत. सरकारने यात ६.६ टक्के दर अपरिवर्तित ठेवले आहेत. हे दर अजूनही ब-याच बँकांच्या मुदत ठेवीं योजनांच्या दरांपेक्षा जास्त आहेत.
एमआयएस मार्फत गुंतवणूकदारांना खूप फायदा होतो. यात पैसे गुंतवून ते जास्तीत जास्त नफा कमवू शकतात. या योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नसते. पोस्ट ऑफिसची मासीक उत्पन्न योजना प्रत्येक मासीक पगार घेणा-यांसाठी फलदायी आहे. यात ठरवून दिलेली व्याजाची रक्कम देखील कमी जास्त होत नाही. बाजारभावात काही बदल झाला तरी व्याज दर तसाच राखला जातो.
एमआयएस हे खाते उघडायचे असल्यास सुरुवातीला किमान १००० रुपये असणे आवश्यक आहे. तरच तुमचे खाते उघडले जाउ शकते. त्यानंतर देखील या योजनेत पोस्ट ऑफिसच्या नियमांनुसार ही रक्कम १००० च्या घरातच असावी. हा नियम १ एप्रिल २०२० पासून सुरू झाला आहे. एक खाते असल्यास त्यासाठी कमाल गुंतवणूक ४.५ लाख रुपये इतकी आहे. यात संयूक्त खाते असलेले खातेदार देखील गुंतवणूक करु शकतात. त्यासाठी ९ लाख रुपये कमाल आहेत. संयूक्त खात्यात दोन्ही व्यक्तींना समान हिस्सा दिला जातो.
या योजनेतून तुम्हाला जर २ लाख रुपये जमा करायचे असतील तर दर महा तुम्हाला १,१०० रुपये व्याज दराने मिळतील. तसेच जर मुलांच्या शिक्षणासाठी ३.५० लाख गुंतवणार असाल तर त्यावर १९२५ रुपये व्याज दिले जाइल. तर ४.५ लाख जमा केल्यास त्यावर २४७५ रुपये व्याज दिसेल. पाच वर्षांच्या मुदती नंतर पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस जारी होइल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Post Office Scheme for best return check details 16 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO