21 April 2025 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | वेगाने धावणार टाटा मोटर्स शेअर्स, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS GTL Share Price | या बातमीचा जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकवर परिणाम होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: GTLINFRA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा चिल्लर प्राईस पेनी स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 627% परतावा दिला - NSE: RTNPOWER IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Post Office Scheme | प्रचंड फायद्याची पोस्टाची योजना, लाखात व्याज, तर मॅच्युरिटीला मिळतील 7,24,974 रुपये - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • टाईम डिपॉझिट योजना :
  • ही योजना देते टॅक्स सूटचा लाभ :
  • योजनेकडून दिली जाते चांगली सुरक्षा :
  • असं बनता येईल व्याजातूनच लक्षाधिश :
Post Office Scheme

Post Office Scheme | अनेक व्यक्ती आपल्यावर कधीही कोणतीही वाईट वेळ येऊ शकते किंवा आपल्याला अचानक मोठा खर्च करावा लागू शकतो या विचाराने पैसे गुंतवण्याचा मार्ग शोधत असतात. दरम्यान सध्या पोस्टाच्या अनेकानेक भन्नाट योजना सुरू आहेत. या योजनांमधून तुम्ही चांगला नफा मिळवून म्हणजे तो व्याजदर मिळवून लखपती बनू शकता. बरोबर प्रत्येक व्यक्ती आपल्या बजेटनुसार आणि चांगल्या वेळेनुसार ऍडजस्टेबल असणारी योजना शोधतात.

आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेतून तुम्ही जास्तीत जास्त नफा कमवू शकता. या योजनेमध्ये तुम्ही 1 ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता परंतु या वर्षांमधील व्याजदराचे प्रमाण वेगवेगळे असणार आहे.

टाईम डिपॉझिट योजना :

पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना तुम्हाला वेगवेगळ्या कार्यकाळापर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा देते. वेगवेगळ्या कार्यकाळावर वेगवेगळे व्याजदर देखील लागू करते. समजा तुम्ही 1 वर्षासाठी योजनेमध्ये गुंतवणूक केली तर 6.9% व्याजदर मिळेल. जर तुम्ही 2 किंवा 3 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 7% व्याजदर मिळेल. त्याचबरोबर तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.5% व्याजदर मिळते.

ही योजना देते टॅक्स सूटचा लाभ :

टाईम डिपॉझिट योजना ग्राहकांना आयकर कायद्याअंतर्गत आणि 1961 च्या 80C कलम अंतर्गत कर सवलत प्रदान करते. त्याचबरोबर टाईम डिपॉझिट योजनेमध्ये तुम्ही सिंगल आणि जॉईंट दोन्हीही अकाउंट ओपन करू शकता. सोबतच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही हे खातं उघडण्यास पात्र आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचं खातं त्यांचे पालक उघडू शकतात. यासाठी तुम्हाला 1000 रुपये भरून खातं उघडावं लागेल. ज्यामध्ये वार्षिक व्याजदर देखील जोडले जाईल. म्हणजेच काय तर, तुम्ही जेवढे जास्त पैसे गुंतवाल तेवढाच जास्त नफा तुम्हाला मिळणार आहे.

योजनेकडून दिली जाते चांगली सुरक्षा :

पोस्टाच्या या योजनेमध्ये तुम्हाला चांगली सुरक्षा प्रधान करण्यात येते. त्याचबरोबर तगडा रिटर्न आणि टॅक्स सूटचा लाभ देखील अनुभवता येतो. योजनेच्या या खास वैशिष्ट्यांमुळेच अनेक व्यक्ती या योजनेचा लाभ घेताना पाहायला मिळतात.

असं बनता येईल व्याजातूनच लक्षाधिश :

टाईम डिपॉझिटच्या कॅल्क्युलेशन बद्दल सांगायचं झालं तर, समजा एखाद्या व्यक्तीने टाईम डिपॉझिट या योजनेमध्ये तब्बल 5 वर्षांसाठी 5 लाखांची गुंतवणूक केली असेल आणि 5 वर्षांच्या व्याजदराच्या हिशोबाने म्हणजेच 7.5% या व्याजदराने त्या व्यक्तीला कालावधी ठेवीवर अधिक 2% व्याजदर मिळाला असता व्याजाची रक्कम 24,974 रुपये एवढी होईल. म्हणजेच संपूर्ण मॅच्युरिटी पिरियडनंतर त्या व्यक्तीच्या हातात एकूण 7,24,974 रुपये येतील. म्हणजेच केवळ व्याजातूनच तो व्यक्ती लक्षाधिश बनू शकतो.

Latest Marathi News | Post Office Scheme Interest Rates 25 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(231)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या