18 November 2024 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Post Office Scheme | टेन्शन नको! महिना रु.9250 देईल ही योजना, महिना खर्चाची चिंता मिटेल बचतीतून

Post Office Scheme

Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस अल्पबचत हा आकर्षक पर्याय आहे. एकापेक्षा अधिक योजना आहेत, त्यापैकी काही नियमित उत्पन्नाचा पर्याय देखील देतात. जर तुम्ही एकदा गुंतवणूक करून रेग्युलर इनकमचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम मंथली इनकम अकाउंटचा फायदा घेऊ शकता.

दर महा, स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते. जाणून घ्या काय म्हणतात या योजनेचे नियम.

योजनेचे फायदे जाणून घ्या
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात, तर संयुक्त खात्याद्वारे जास्तीत जास्त ठेवमर्यादा 15 लाख रुपये आहे. खाते उघडण्यासाठी कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे, त्यानंतर ते 1000 रुपयांच्या पटीत जमा केले जाऊ शकतात. पती-पत्नी जॉईंट खात्यात प्रत्येक खातेधारकाचा बचतीत समान वाटा असतो.

या योजनेत प्रौढ व्यक्ती आपल्या नावाने एकच खाते उघडू शकते, तर 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. एकाच खात्यात जास्तीत जास्त ठेवमर्यादा 9 लाख रुपये आहे, तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ठेवमर्यादा 15 लाख रुपये आहे.

खात्यात पैसे कसे येतात?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर चालू तिमाहीसाठी वार्षिक 7.4 टक्के व्याज दर आहे. या खात्यात जमा झालेल्या फंडावर मिळणारे वार्षिक व्याज १२ भागांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक भाग आपल्यासाठी मासिक उत्पन्न म्हणून काम करतो, जो आपण दर महिन्याला काढू शकता. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, परंतु 5 वर्षानंतर नवीन व्याजदरानुसार ती वाढवली जाऊ शकते.

पती-पत्नी जॉईंट खात्यातील रक्कम
* जॉईंट खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक : 15 लाख रुपये
* व्याजदर : 7.4 टक्के वार्षिक
* वार्षिक व्याज: 1,11,000 रुपये
* महिना व्याज रक्कम : 9250 रुपये

सिंगल खात्यातील रक्कम
* सिंगल अकाऊंटमधून जास्तीत जास्त गुंतवणूक : 9 लाख रुपये
* व्याजदर : 7.4 टक्के वार्षिक
* वार्षिक व्याज: 66,600 रुपये
* महिना व्याज रक्कम: 5550 रुपये

100% सुरक्षित योजना
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही सरकार पुरस्कृत अल्पबचत योजना आहे, जिथे गॅरंटीड परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस योजनेमुळे ते 100 टक्के सुरक्षित आहे. एकाच खात्यासह जोडीदारासह संयुक्त खाते उघडण्याची ही सुविधा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme Interest Rates check details 02 August 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(188)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x