
Post Office Scheme | सरकारने आतापर्यंत गरजू महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. सरकारच्या जास्त योजना या सामान्य आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी असतानाच्या पाहायला मिळतात. दरम्यान पोस्टाच्या देखील बऱ्याच योजनांचा लाभ तुम्ही आतापर्यंत घेतला असेल.
परंतु पोस्टाने आपल्या ताई, आई, बायको आणि मुलीसाठी एकंदरीतच महिलांसाठी दोन वर्षांसाठीची एक भन्नाट स्कीम काढली आहे. ही स्कीम प्रत्येक सर्वसामान्य महिलेला फक्त पाच नाही, तीन नाही तर फक्त दोन वर्षांतच लखपती बनवणार आहे. तुम्हाला सुद्धा लखपती बनण्याची संधी सोडायची नसेल तर त्वरित या योजनेचा लाभ घ्या.
पोस्टामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये कोणतीही भारतवासी महिला दोन वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये वयाची कोणतीही अट नाही. अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कोणीही या योजनेसाठी पात्र आहे. मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणाऱ्या महिलांच्या या योजनेचं नाव महिला सन्मान बचत पत्र असं असून ही योजना केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे.
केंद्र सरकारने 2023 सालापासून या योजनेचे काम सुरू केले होते. फार कमी वेळामध्येच या योजनेने उच्चांक गाठला आहे आणि महिलांसाठी पोस्टाची ही योजना आवडीची योजना ठरली आहे.
किती व्याज मिळतं?
या स्मॉल सेविंग योजनेमध्ये महिला फक्त दोन वर्षांपर्यंतच इन्व्हेस्टमेंट करू शकतात त्याचबरोबर दोन वर्षांमध्ये दोन लाख रुपये एवढी रक्कम त्या गुंतवू शकतात. या दोन लाखांचं त्यांना 7.5% एवढं व्याज ऑफर केलं जातं.
असे मिळवा लाखो रुपये :
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये दोन वर्षांपर्यंत दोन लाख रुपये इन्वेस्ट करू शकतात. याचा त्यांना व्याजाच्या दरात चांगला परतावा मिळतो. दोन वर्षांमधील व्याजाची रक्कम ₹32044 एवढी मिळेल. तर, दोन वर्षानंतर अकाउंट बंद करताना तुमच्या हातात पूर्ण 2,32044 एवढे रुपये येतील.
हे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे :
महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड या कागदपत्रांची गरज भासणार आहे. त्याचबरोबर त्यांना एक चेक देणं आणि केवायसी असणं अनिवार्य आहे.





























