22 November 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Post Office Scheme | महिना खर्चाची चिंता नको, ही सरकारी योजना दरमहा 5,550 रूपये देईल, फायदा घ्या - Maharashtranama Marathi

Post Office Scheme

Post Office Scheme | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती रिटायरमेंटनंतर आपल्याला कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही याचं प्लॅनिंग नोकरी असतानाच करून ठेवतो. म्हणजेच योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवतो. त्यामुळे व्यक्तीला स्वतःचे पैसे गुंतवण्यासाठी एक विश्वासाहार्य जागा हवी असते.

पोस्टाच्या अंतर्गत पैसे गुंतवणुकीच्या अनेक योजना राबविला जात आहेत. म्हणून रिटायरमेंटनंतर स्वतःचं जीवन सोयीस्कर बनावं असं वाटणाऱ्या व्यक्तींसाठी पोस्टाची ही स्कीम फायद्याची ठरू शकते. या स्कीमचं नाव पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम असं असून, तुम्ही गुंतवलेल्या ठराविक रकमेवर योग्य व्याजदर दिला जातो. त्यामुळे बँक एफडीपेक्षा ही स्कीम फायद्याची ठरते.

कोण किती पैसे गुंतवू शकतो?
पोस्टाच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिस सेविंग स्कीमच्या या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही या सरकारी योजनेमध्ये सिंगल अकाउंट ओपन केलं असेल तर 9 लाखांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशातच तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन केलं असेल तर 15 लाखांपर्यंत पैसे गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम पाच वर्षांच्या कार्यकाळापर्यंत मॅच्युअर होते. म्हणजेचं तुम्ही पाच वर्षानंतर तुमची प्रिन्सिपल अमाऊंट काढू शकता.

सोबतच गुंतवणूकदारांसाठी यामध्ये आणखीन एक ऑप्शन दिलं गेलं आहे. यामध्ये पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर पैसे न काढता तुम्ही आणखीन पाच वर्ष हे अकाउंट सुरू ठेवू शकता. अशा पद्धतीची तरतुदी यामध्ये केली गेली आहे. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स कापला जातो. परंतु यावर TDS कापला नाही जात.

प्रीमॅच्यूअर क्लोजर नियम :
प्री मेच्यूअर नियमानुसार तुम्ही एक वर्षानंतरच तुमची साठलेली रक्कम काढू शकता. जर तुम्ही एका वर्षाच्या आतमध्ये पैसे काढले तर तुमच्याकडून पेनल्टी चार्ज घेतला जातो. एका वर्षामध्येच पैसे काढल्याने संपूर्ण रकमेची पेनल्टी म्हणून 1 पर्सेंट % अमाऊंट कापून घेतली जाते. जर तुम्ही 1 ते 3 वर्षांमध्ये पैसे काढले तर, डिपॉझिट अमाऊंटमधून 2% अमाऊंट कापली जाते परंतु परत दिली देखील जाते.

कॅल्क्युलेशन :
गुंतवणूकदार एकदमच 9 लाखांपर्यंत पैसे गुंतवत असेल तर, पाच वर्षाच्या मॅच्युरिटी पिरियडमध्ये 7.4% ने फक्त व्याजाचीच 3,33,000 एवढी रक्कम बाजूला पडते. महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं असता 5,550 ही रक्कम दरमहा सुरू राहील.

News Title : Post Office Scheme MIS Interest Rates check details 06 September 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x