23 January 2025 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा Salary Vs Saving Account | सॅलरी आणि बचत खात्यात नेमका फरक काय, व्याजदर आणि मिनिमम बॅलेन्सचे नियम लक्षात ठेवा Penny Stocks | श्रीमंत करणार हा 1 रुपयाचा पेनी शेअर, 5 दिवसात 22% कमाई, यापूर्वी 857% परतावा दिला - BOM: 511012 Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला, तज्ज्ञांकडून मोठे संकेत - NSE: IREDA
x

Post Office Scheme | भारतीय पोस्ट ऑफिसने जाहीर केली नवीन हेल्थ इन्शुरन्स योजना, फक्त 299 रुपयात मिळवा 10 लाख रुपयांचा विमा

Post office scheme

Post Office Scheme | भारतीय पोस्ट खाते आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन योजना जाहीर कर असते. अशीच एक आपल्या फायद्याची गुंतवणूक योजना पोस्ट ऑफिस ने जाहीर केली आहे. या योजनेचे नाव आहे, इंडिया पोस्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन. जर तुम्ही स्वस्त, सुरक्षित, आणि चांगली आरोग्य विमा योजना शोधत असाल, भारतीय पोस्ट ऑफिस तुमच्या साठी घेऊन आली आहे, इंडिया पोस्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता आणि जीवन विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.

युद्ध, महामारी आणि आपल्या जीवनशैलीतील अनियमिततेमुळे आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आपले शरीर आणि आरोग्य कमजोर होत जाते, केव्हाही वैद्यकीय उपचाराला सामोरे जावे लागू शकते, अशी परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीत आपल्या कडे आरोग्य विमा असला पाहिजे. आणि याची गरज सध्याच्या काळात अनेक पटींनी वाढली देखील आहे. दरवर्षी भरावा लागणारा आरोग्य विम्याचा हप्ता खूप जास्त असल्याने लोक सामान्यपणे स्वस्त आणि सुरक्षित आरोग्य विमा पॉलिसी शोधत असतात. सर्वानाच पॉलिसी घेणे परवडते असे नाही.

योजनेचे लाभ :
सध्याच्या आर्थिक कमजोरीच्या आणि भरमसाठ महागाईच्या युगात आरोग्य विम्याची निकड आणि लोकांच्या आर्थिक गरजा आणि क्षमता लक्षात घेऊन भारतीय पोस्ट ऑफिसने एक उत्तम योजना सुरू केली आहे. या योजनेला “अपघाती विमा पॉलिसी” असे नाव देण्यात आले आहे. या विमा पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर विमाधारक व्यक्ती दुर्दैवाने अपघाताचा बळी ठरली तर हॉस्पिटलायझेशनचा खर्च, उपचार खर्च, औषध खर्च, या योजनेअंतर्गत भरून दिला जातो.

पॉलिसी प्रीमियम आणि फायदे :
या आरोग्य विमा योजने अंतर्गत रुग्णालयात उपचारादरम्यान 60 हजार रुपये पर्यंत ओपीडी खर्च आणि 30 हजार विमा क्लेम दिला जातो. या विमा प्लॅनमध्ये 299 रुपये आणि 399 रुपये या दोन प्रीमियमसह 10 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय विमा कव्हर उपलब्ध करून दिले जाते. वास्तविक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचा टाटा एआयजी या संस्थेशी करार झाला आहे. या कराराअंतर्गत 18 ते 65 वयोगटातील भारतीय नागरिक या विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. वैद्यकीय आरोग्य सुरक्षेमध्ये अपघाती मृत्यू, कायमचे किंवा अंशतः अपंगत्व आणि अर्धांगवायू झाल्यास 10 लाखांची सुरक्षा कवच दिले जाईल. या आरोग्य विमा पॉलिसीचा लाभ मिळत राहण्यासाठी तुम्हाला दरवर्षी या पॉलिसीचे नूतनीकरण करणे बंधनकारक असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विमा योजनेचे खाते उघडणे आवश्यक आहे.

त्याच वेळी, इंडिया पोस्टच्या 399 रुपयांच्या आरोग्य विमा योजनेत इतर फायदे देखील देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला 2 मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. जर पॉलिसी धारक हा 10 दिवस रुग्णालयात दाखल असल्यास प्रतिदिन 1,000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office scheme of Health and Life insurance policy benefits on 15 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x