27 April 2025 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस RD स्कीममध्ये दर महिन्याला 2000, 3000, 5000 रुपये बचातीवर किती परतावा मिळेल

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसगुंतवणुकीसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. शिवाय मिळणारा परतावाही निश्चित असतो.

अशावेळी तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत थोडी गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट किंवा आरडी स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही अतिशय खास योजना आहे. या योजनेत तुम्ही दर महिन्याला थोडी फार गुंतवणूक करून मोठा फंड जमा करू शकता. केवळ 100 रुपयांपासून तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. पोस्ट ऑफिसआरडी स्कीममध्ये 6.7 टक्के व्याजदराने परतावा मिळतो. ही योजना पाच वर्षांत परिपक्व होते.

आरडी स्कीममध्ये दरमहा 2000 रुपयांची गुंतवणूक
जर तुम्ही पोस्ट ऑफिसआरडी स्कीममध्ये दरमहा 2000 रुपये सातत्याने गुंतवले तर 5 वर्षात तुम्ही एकूण 1,20,000 रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,42,732 रुपये मिळतील. यापैकी केवळ 22,732 रुपये तुमचे व्याज असेल.

आरडी स्कीममध्ये दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक
जर तुम्ही पोस्ट ऑफिसआरडी स्कीममध्ये दरमहा सतत 3000 रुपये गुंतवत असाल तर तुम्ही 5 वर्षात एकूण 1,80,000 रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,14,097 रुपये मिळतील. यापैकी केवळ ३४,०९७ रुपये तुमचे व्याज असेल.

आरडी स्कीममध्ये दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक
जर तुम्ही पोस्ट ऑफिसआरडी स्कीममध्ये दरमहिन्याला सतत 2000 रुपये गुंतवत असाल तर तुम्ही 5 वर्षात एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 3,56,830 रुपये मिळतील. यापैकी केवळ 56,830 रुपये तुमचे व्याज असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(233)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या