18 November 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी भन्नाट स्कीम; ही सरकारी योजना दरमहा देईल 20,500 रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंटनंतर आपलं आयुष्य अतिशय निवांत असावं सोबतच इन्कमचा एखादा सोर्स असावा. जेणेकरून साठीनंतरचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल आणि म्हातारपणात इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही असं प्रत्येकाला वाटतं.

बरेचजण रिटायरमेंटचा चांगला लाभ घेण्यासाठी नोकरीला असतानाच चांगला बँक बॅलेन्स करून ठेवतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्कीममध्ये पैसे देखील गुंतवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीम बद्दल सांगणार आहोत. जी जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय फायद्याची ठरू शकेल.

(SCSS) सीनियर सिटीजन सेविंग स्कीम :
ही पोस्ट ऑफिसची एक छोटी स्कीम आहे. स्कीम जरी छोटी असली तरी तिचा लाभ दुपटीने आपल्याला मिळू शकतो. रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना राबवली जाते. या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यामुळे तुम्हाला रिटायरमेंट नंतर देखील पेन्शन चालू राहील. तब्बल 20,500 रूपये दर महिन्याला तुमच्या हातात येतील.

स्कीमचा मॅच्युरिटी पिरेड आणि पैसे गुंतवण्याची लिमिट :
या स्कीमचा मॅच्युरिटी पिरेड पाच वर्षांपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही पाच वर्षांपर्यंत या स्कीममध्ये पैसे गुंतवू शकता. फक्त या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असायला हवं. साठ वर्ष उलटून गेलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा भाग बनू शकतो. या योजनेमध्ये पैसे गुंतवण्याची मर्यादा आधी पंधरा लाखापर्यंत होती परंतु आता 30 लाखांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवून अधिक लाभ मिळवू शकता.

या लोकांसाठी देखील आहे योजना :
जे व्यक्ती स्वतःच्या मर्जीने आधीच सेवानिवृत्ती घेतात त्यांच्यासाठी देखील ही योजना उपलब्ध आहे. तुमचं वय 55 ते 60 च्या दरम्यान असेल तर, तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकता. त्यामुळे लगेचच तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचं खातं उघडा.

व्याजाची रक्कम केवढी?
जर तुम्ही पाच वर्षांमध्ये 30 लाख रुपयांपर्यंत सातत्याने गुंतवणूक केली तर, तुम्हाची दरवर्षी 2,46,000 रुपये एवढी रक्कम फक्त व्याजाची जमा होईल. हे पैसे महिन्याच्या हिशोबाने कॅल्कुलेट केले तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20,500 रुपयांपर्यंत एका पेन्शनच्या स्वरूपात पैसे येत राहतील. त्याचबरोबर या योजनेमधून मिळणाऱ्या पैशांवर तुम्हाला टॅक्स देखील भरावा लागतो. रिटायरमेंटनंतर ज्यांना रिलॅक्स जीवन जगायचं आहे त्यांनी या स्कीमचा विचार करायला हरकत नाही.

News Title : Post Office Scheme SCSS Interest Rates for monthly income 04 September 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(188)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x