16 April 2025 9:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या

Post Office Schemes

Post Office Schemes | बहुतांश व्यक्ती सरकारी योजनांमध्ये त्याचबरोबर सरकारी बँकेत वेगवेगळ्या फंडांत पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात. बँकेप्रमाणे पोस्टामध्ये देखील कमी मुदत काळापासून ते दीर्घकाळापर्यंत गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध आहेत. आज या बातमीपत्रातून पोस्टाच्या एकूण 6 दमदार योजनांची माहिती सांगणार आहोत. या योजना वर्षाला 7.5% ते 8.2% पर्यंत घसघशीत परतावा मिळवून देतात.

पोस्ट ऑफिस FD :

पोस्टाची एफडी ही पूर्णतः बँक एफडीप्रमाणे असते. यामध्ये 1, 2, 3 किंवा 5 वर्षांपर्यंत तुम्ही तुमची रक्कम गुंतवू शकता. जो व्यक्ती सातत्याने 5 वर्षांपर्यंत पोस्टाच्या FD योजनेमध्ये गुंतवणूक करतो त्याला 7.5% दराने व्याजदर प्रदान केले जाते. पोस्टाची एफडी बँकेतील एफडीप्रमाणे असली तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये देखील टॅक्स बेनिफिटचा लाभ अनुभवायला मिळतो.

पोस्ट ऑफिस NSC :

पोस्टाची NSC म्हणजेच ‘नॅशनल सेविंग सर्टिफिकेट’ ही योजना देखील अत्यंत कमालीची आहे. या योजनेवर गुंतवणूकदाराला दमदार परतावा मिळतो. समजा तुम्ही या योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घेता तर, तुम्हाला पाच वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडवर 7.7% दराने व्याजदर मिळेल.

पोस्ट ऑफिस MSSC :

पोस्ट ऑफिस ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ ही योजना खास महिलांसाठी तयार केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये आत्ता 31 मार्च 2025 या तारखेपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या महिलांना जास्तीत जास्त परतावा कमवायचा आहे त्यांच्यासाठी पोस्टाची महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना फायदेशीर ठरेल. ही योजना गुंतवणूकदारांना 7.5% व्याजदर प्रदान करते.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम :

पोस्टाचे ‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ ही योजना ज्येष्ठ नागरिकांना रिटायरमेंट फंड तयार करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. रिटायरमेंटनंतरचा काळ अतिशय आरामात आणि आनंदात जाण्यासाठी या योजनेचे डिझाईन प्लॅन केले आहे. तुम्हाला या योजनेमध्ये 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. दरम्यान योजना तुम्हाला 8.2% दराने व्याजदर प्रदान करते. व्याजाची टक्केवारी जास्त असल्यामुळे तुम्ही नक्कीच 5 वर्षांत मालामाल व्हाल.

किसान विकास पत्र :

दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘किसान विकास पत्र’ या योजनेचा पर्याय देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला 115 महिन्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. 7.5% मिळणाऱ्या व्याजदरानुसार तुम्ही दुप्पटीने पैसे कमवून श्रीमंत बनू शकाल.

सुकन्या समृद्धी योजना :

पोस्टाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ खास मुलींसाठी तयार केली आहे. ही योजना तुम्हाला केवळ पोस्ट ऑफिसमध्ये नाही तर बँकेत देखील पाहायला मिळेल. बहुतांश व्यक्ती या योजनेत दीर्घकाळासाठी पैसे गुंतवत आहेत. गुंतवणुकीविषयी सांगायचे झाले तर तुम्ही यामध्ये 250 रुपयांपासून सुरुवात करून दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या योजनेत एकूण पंधरा वर्षांपर्यंत गुंतवणूक करावयाची असते. 21 वर्षानंतर योजनेचा कार्यकाळ संपतो आणि तुम्हाला 8.2% टक्के व्याजदराने घसघशीत परतावा देखील मिळतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Schemes Saturday 11 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या