Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेचे फायदे आणि व्याज परतावा, जाऊन घ्या गुंतवणूक प्रोसेस आणि कमवा भरघोस पैसा

Post Office Scheme | आपण गुंतवणूक करताना अनेकदा खूप विचार करतो, किंवा जोखीम घेण्यास घाबरत असतो, कारण आपल्याला पैसे बुडण्याची भीती असते. मुळात आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर सुरक्षा हमी हवी असते. जे लोक गुंतवणूक करण्यास घाबरतात, अशा लोकांसाठी इंडिया पोस्ट ऑफिसने जबरदस्त मुदत ठेव गुंतवणूक योजना आणली आहे. ज्यांना आपल्या गुंतवणुकीवर सुरक्षित आणि हमखास परतावा पाहिजे असेल, ही योजना त्यांच्यासाठी योग्य आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची भीती नसते. पोस्ट ऑफिस ची मुदत ठेव योजना कमी वेळेत अधिक नफा देते. तुम्हालाही सुरक्षित योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करू शकता. आज आम्ही या लेखात तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करून फक्त 3 वर्षांत 10 लाख रुपये कसे मिळवू शकता हे सांगणार आहोत.
गुंतवणूक किती करावी? :
पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिस च्या शाखेत जाऊन या योजनेचे खाते उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 3 वर्षात 10 लाख रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी 8.50 लाख रुपये एकरकमी जमा करावे लागतील आणि त्यावर तुम्हाला व्याज परतवा दिला जाईल.
गुंतवणुकीवर व्याज परतावा दर :
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर वार्षिक 5.5.टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. या व्याजदरानुसार, फक्त 3 वर्षात तुम्ही मॅच्युरिटीवर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नफा मिळवू शकता. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर 3 वर्षात 5.5 टक्के दराने 1.51 लाख रुपये व्याज परतावा दिला जाईल.
किमान गुंतवणूक रक्कम :
तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करून चांगला लाभ मिळवायचा असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही टाइम डिपॉझिट खाते उघडू शकता. ह्या योजनेला मुदत ठेव म्हणूनही ओळखले जाते. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत किंमत 1,000 रुपयेची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. 10 वर्ष वयापेक्षा अधिक वयाची कोणतीही व्यक्ती मुदत ठेव योजनेत गुंतवणूक सुरू करू शकते.
अल्पवयीन मुलासाठी गुंतवणूक नियम :
या योजनेत गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला तुमच्या अल्पवयीन मुलासाठी खाते उघडायचे असेल, तर ते फक्त पालक द्वारे किंवा पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाऊ शकते. या योजनेत तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता.
योजनेचे अन्य फायदे सविस्तर :
पोस्ट ऑफिस च्या मुदत ठेव योजनेचा आणखी एक फायदा असा आहे की, तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी तुमचे पैसे काढू शकता. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली तर अश्या वेळी योजनेतील जमा केलेली रक्कम सहज काढता येते. याचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या गुंतवणुकीच्या 6 महिन्यांनंतर पैसे काढता येणार नाही. जर 6 ते 12 महिन्यांच्या दरम्यान तुम्ही खात्यातून पैसे काढले तर तुम्हाला बचत खात्याइतकेच व्याज दिले जाईल. 2, 3 किंवा 5 वर्षाआधी पैसे काढल्यास एकूण व्याजातून 2 टक्के शुल्क रक्कम वजा केली जाईल, आणि उर्वरित पैसे तुम्हाला दिले जातील.
व्याज दरात बदल :
पोस्ट ऑफिस च्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर बदलू शकतात. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्किमचे व्याजदर प्रत्येक तिमाहीनुसार बदलेल जाते. 1 ऑक्टोबरपासून या योजनेतील व्याजदर पुन्हा बदलू शकतात. मुदत ठेव योजनेचे व्याज दर कमी जास्त होऊ शकतात. पण बचत खात्यावरील व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Post office Time deposit scheme Investment returns benefits on 27 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP