PPF Scheme | अप्रतिम आणि फायद्याची सरकारी गुंतवणूक योजना, छोटी रक्कम गुंतवून मिळतोय मजबूत परतावा, योजनेबद्दल जाणून घ्या

PPF Scheme | योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हीही अल्प कालावधीत करोडपती होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करावी. गुंतवणूक बाजारात अश्या अनेक योजना आहेत, ज्या तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतात. अश्या योजनांमध्ये तुम्हाला मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही छोटी रक्कम जमा करूनही अश्या योजनेतून भरपुर परतावा कमवू शकता. अशीच एक गुंतवणूक योजना आहे, ज्यात दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा कमवू शकता. या योजनेचे नाव आहे “सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी”. या योजनेत तुम्हाला जास्त गुंतवणुक करण्याची गरज नाही. तुम्ही दर महिन्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये फक्त छोटी रक्कम जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत तुम्ही नियमित गुंतवणूक करत राहिल्यास निवृत्तीपूर्वी तुम्ही करोडो रुपयांचा परतावा कमवू शकता.
दीर्घकालीन गुंतवणूक योजना :
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF हा एक फायदेशीर पर्याय मानला जातो. या योजनेत गुंतवणूक करत राहिल्यास तुम्ही खूप चांगला परतावा कमवू शकता. पीपीएफमध्ये तुम्ही एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकता, या अर्थ मासिक 12,500 रुपये तुम्ही जमा करू शकता. जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती काळासाठी पैसे गुंतवणूक करावी लागेल, ह्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
PPF योजनेत 7.1 टक्के परतावा :
सध्या भारत सरकार PPF योजना खात्यावर आपल्या गुंतवणूक रकमेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेचा कमाल गुंतवणूक कालावधी 15 वर्ष आहे. दर महिन्याला जर तुम्ही 12500 रुपये PPF खात्यात जमा करत असाल तर 15 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 40,68,209 रुपये असेल. यामध्ये एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये असून व्याज.परतावा असून तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 18,18,209 रुपये असेल.
PPF योजनेतील गुंतवणूक परतावा काही उदाहरणाने समजून घेऊ :
प्रकरण क्रमांक : 1
समजा तुमचे आजचे वय 30 वर्षे असून तुम्ही PPF योजनेत गुंतवणूक सुरु केली आहे. तुम्ही दर महिन्याला 12500 रुपये PPF खात्यात जमा करत असाल तर 20 वर्षांनी तुमची गुंतवणूक रक्कम 66,58,288 5 रुपये असेल. जर ही गुंतवणूक तुम्ही आणखी 5 वर्षांने वाढवली तर 25 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक मूल्य रक्कम 1,03,08,015 रुपये असेल.
अशा प्रकारे तुम्ही करोडपती व्हाल :
जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी पीपीएफ योजनेमध्ये दरमहा 12500 रुपये गुंतवले तर 25 वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी तुमचा कडे करोडो रुपयांचा फंड तयार झाला असेल. PPF खात्याची मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. जर तुम्ही PPF खाते 15 वर्षांसाठी सुरू केले तर, त्यात तुम्ही आणखी पाच वर्ष वाढ करू शकता.
प्रकरण क्रमांक : 2
समजा वयाच्या 25 व्या वर्षी तुम्ही PPF गुंतवणूक सुरू केली आणि त्यात दर महिन्याला 10,000 रुपये जमा केले तर 7.1 टक्के चक्रवाढ व्याज परताव्या नुसार 15 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 32,54,567 रुपये असेल. आणि ह्यात जर तुम्ही आणखी 5 वर्षांसाठी वाढ केली तर 20 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 53,26,631 रुपये झाले असेल. दर पाच वर्षांनी तुम्ही गुंतवणूक मुदत वाढवत घेल्यास 25 वर्षांनंतर एकूण गुंतवणुकीचे मूल्य 82,46,412 रुपये असेल. 30 वर्षांनंतर एकूण गुंतवणूक मूल्य 1,23,60,728 रुपये होईल. अश्याप्रकारे वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती झालेले असाल.
प्रकरण क्रमांक : 3
समजा तुम्ही PPF मध्ये दर महिन्याला 7500 रुपये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर 7.1 टक्के व्याज दराने 15 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 24,40,926 रुपये असेल. त्यानंतर तुम्ही दर 5 वर्षांनी मुदत वाढवू शकता. 20 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 39,94,973 रुपये झाले असेल. ही गुंतवणूक आणखी पाच वर्ष वाढवली तर 25 वर्षांनी गुंतवणूक मूल्य 61,84,809 रुपये होईल. आणखी पाच वर्ष गुंतवणूक वाढवली तर 30 वर्षांनंतर तुमचे गुंतवणूक मूल्य 92,70,546 रुपये झाले असेल. 35 वर्षांनंतरचे गुंतवणूक मूल्य 1,36,18,714 रुपये होईल. याचा अर्थ जेव्हा तुम्ही 55 वर्षांचे व्हाल, तेव्हा तुमच्याकडे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल. PPF योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपयांचा परतावा मिळवणे सोपे आहे, पण त्यासाठी तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळवण्यासाठी दीर्घकाळ संयमाने गुंतवणूक करावी लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| PPF Scheme Investment benefits on long term investment check details 29 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER