15 January 2025 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | रिटायरमेंट झाल्यानंतर बहुतांश व्यक्तींना त्यांच्या उतार वयात एक रेगुलर इनकम सोर्स हवा असतो. तुम्ही देखील रिटायर होऊन आपले पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा प्लॅन करत असाल तर, तुमच्यासाठी सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अत्यंत फायद्याची ठरू शकते. या योजनेमध्ये जास्तीत जास्त जमा रक्कमेवर 3 महिन्यांच्या आधारावर 60,000 व्याज मिळवू शकता. समजा तुम्ही आणि तुमची पत्नी म्हणून दोघांनीही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या अकाउंटमध्ये खाते खोलले तर, दोघांनाही मजबूत लाभ मिळेल.

सर्वाधिक परतावा देणारी स्मॉल सेविंग योजना :

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना पोस्टाची सर्वाधिक परतावा मिळवून देणारी स्मॉल सेविंग योजना आहे. ही योजना वार्षिक आधारावर 8.2% व्याजदर प्रदान करते. भारतातील कोणताही वरिष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेमध्ये तुम्ही आणि तुमची पत्नी असे दोघे मिळून एक रक्कमी पैसे गुंतवून टॅक्स बेनिफिट आणि रेगुलर वेतन मिळवू शकता.

योजनेचे काही नियम जाणून घ्या :

समजा सीरिअर सिटीजन सेविंग या योजनेत तुम्ही एकटेच एकल खात्यात गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला 30 लाख रुपयांपर्यंत पैशांची गुंतवणूक करावी लागेल. कमीत कमी गुंतवणुकीची लिमिट 1000 रुपयांपासून सुरू होते. त्याचबरोबर तुम्ही एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर गुंतवणूकदाराला चेकद्वारे पेमेंट करावे लागते. त्याचबरोबर एक लाखां होऊन कमी पैसे भरायचे असतील तर कॅश जमा करावी लागते.

पोस्टाच्या खात्यात एकाच घरातील दोन व्यक्तींचे अकाउंट :

पोस्टाच्या या ज्येष्ठ नागरिकांकरिता सर्वोत्तम असणाऱ्या योजनेत तुम्ही दोन खाते उघडू शकता. हे दोन खाते एकाच घरातील देखील असू शकतात. तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून असे दोन खाते उघडून बंपर लाभ मिळवू शकता. जॉईंट खात्यात पैसे गुंतवणुकीची लिमिट 60 लाख रुपयांपर्यंत दिली आहे.

2 वेगवेगळ्या खात्यातून किती फायदा होईल :

1. वार्षिक व्याजदर 8.2%
2. 2 खात्यात जमा होणारी रक्कम 60 लाख रुपये
3. योजनेचा मॅच्युरिटी पिरियड : 5 वर्षे
4. तीन महिन्यांनी मिळणारे व्याज : 1,20,300
5. वार्षिक आधारावर मिळणारे व्याज : 4,81,200
6. 5 वर्षांत म्हणजेच मॅच्युरिटी नंतर मिळणारे एकूण व्याज : 24,06,000
7. मिळणारा एकूण परतावा : 84,06,000 लाख रुपये.

सिंगल खात्यातून किती फायदा होईल :

1. वार्षिक आधारावर मिळणारे व्याज : 8.2%
2. सिंगल खात्यात जमा करण्याची रक्कम : 30 लाख
3. तीन महिन्यांनी मिळणारे व्याज : 60,150
4. वार्षिक आधारावर मिळणारे व्याज : 2,40,600
5. गुंतवणुकीचा मॅच्युरिटी पेरियेड : 5 वर्षे
6. मिळणारा एकूण फायदा : 42,03,000 लाख रुपये.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme Wednesday 15 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Saving Scheme(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x