22 October 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसचा योग्य ठिकाणी वापर कसा करावा जाणून घ्या, डोक्यावरचा आर्थिक भार हलका होईल Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मोठी झेप घेणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तुफान तेजीने संकेत, फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, मल्टिबॅगर शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी - BOM: 543499 Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY NHPC Share Price | NHPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 49% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: NHPC
x

Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल

Smart Investment

Smart Investment | पोस्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या भन्नाट योजना राबवल्या जातात. यामधील बऱ्याच योजना महिलांच्या सशक्तिकरण्यासाठी देखील आहेत. दरम्यान एक योजना अशी आहे जी कमी काळात अत्यंत लोकप्रिय झाली आहे. ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.

सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या
योजनेत मॅच्युरिटी काळापर्यंत जेवढी गुंतवणूक कराल त्याच्या 3 पटीने जास्त परतावा तुम्हाला योजना संपल्यानंतर मिळणार. समजा तुम्ही 15 वर्षांमध्ये एकूण 5 लाखांचा फंड जमा केला तर, पुढील 21 वर्षापर्यंत तुमच्या खात्यामध्ये तब्बल 15 लाखांचा फंड तयार होईल. यामधील केवळ व्याजाची रक्कमच 10 लाख रुपये असेल.

लेकीसाठी फायद्याची योजना :
सुकन्या समृद्धी योजना ही पोस्टांतर्गत चालवण्यात येणारी अतिशय जबरदस्त योजना असून तुमच्या लेकीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी ती वयात येईपर्यंत भरघोस पैसे जमा करून ठेवू शकता. समजा तुम्हाला एकूण 50 लाखांचा फंड तयार करायचा असेल तर तुम्हाला किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल जाणून घेऊया.

योजनेत गुंतवाय एवढे पैसे :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 50 लाखांचा फंड तयार करण्यासाठी तुम्ही एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करू शकता. सोबतच योजनेमध्ये कमीत कमी पैसे गुंतवण्याची लिमिट 250 रुपये दिली गेली आहे. दरम्यान या योजनेमध्ये सध्याच्या घडीला 8.2% ने व्याजदर प्रदान केले जात आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर, मुलीच्या पालकांनी आणि वडीलधाऱ्या व्यक्तींनी खातं उघडलेल्या चालेल.

असे बनतील 50 लाख :
1 वार्षिक गुंतवणूक : 1,10,000
2 पंधरा वर्षांची एकूण गुंतवणूक : 16,50,000
3 सध्याचे व्याजदर : 8.2%
4 21 वर्षाच्या मॅच्युरिटीपर्यंत जमा होणारी रक्कम : 50,80,224
5 व्याजाचा मिळणारा फायदा : 34,30,224

कॅल्क्युलेशन प्रमाणे तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 3 पटीने जास्त लाभ मिळणार. यासाठी तुम्हाला 50 लाखांचा फंड तयार करायचा असेल तर, तुम्ही एका वर्षात एकूण 1.10 लाख रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

टॅक्स सूटचा लाभ :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूकदाराला कर सवलतीचा फायदा देखील अनुभवायला मिळतो. समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या लेकीच्या नावावर वर्षाला 1.50 लाखांची गुंतवणूक केली असेल तर त्याला इन्कम टॅक्स ॲक्ट सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सूटचा लाभ मिळतो.

मॅच्युरिटीआधी काढली जाऊ शकते रक्कम :
योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल आणि तुमची मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाली असेल तर, तुम्ही तिच्या लग्नासाठी किंवा इतर लेकीच्या खर्चासाठी 50% रक्कम अगदी आरामात काढू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x