21 April 2025 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News

Highlights:

  • Smart Investment
  • किती व्याजदर दिले जाते?
  • 2025 ला योजना होणार बंद :
  • हजार रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक :
  • 2 लाखांच्या जमा रकमेवर किती परतावा मिळेल?
Smart Investment

Smart Investment | 1 एप्रिल 2023 रोजी केंद्र सरकार द्वारे ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ (MSSC) ही योजना सुरू केली होती. महिलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु या योजनेची अंतिम मुदत 2025 पर्यंत असणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठीच असून अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे कोणतीही मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाली तर, ती या योजनेचे पात्र ठरते. 18 वय वर्ष खाली असणाऱ्या मुलींसाठी देखील ही योजना उपलब्ध आहे परंतु यासाठी मुलीच्या पालकांना फॉर्म भरावा लागेल. त्याचबरोबर कागदपत्रांची तरतूद करून ही योजना सुरू करावी लागेल.

किती व्याजदर दिले जाते?
या योजनेची विशेष गोष्ट म्हणजे महिलांना 7.5% टक्के व्याजदराने व्याज दिले जाते. त्याचबरोबर तुम्ही दोन वर्ष या योजनेत गुंतवणूक करू शकता. म्हणजेच या योजनेचा मॅच्युरिटी टाईम दोन वर्षांपर्यंतच अवलंबून आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही स्मॉल फायनान्स बँक सोडल्या तर रेगुलर बँका दोन वर्षांच्या एफडीवर 7.5% व्याजदर देत नाही. त्या मानाने तुम्हाला या योजनेमध्ये जास्त व्याजदराचा फायदा अनुभवता येतो.

2025 ला योजना होणार बंद :
ही योजना 2025 ला बंद होणार असून शेवटची तारीख 31 मार्च 2025 असणार आहे. म्हणजे तुम्हाला आता पैसे गुंतवायचे असतील तर, फक्त एकतीस मार्चपर्यंतच गुंतवता येतील. 1 एप्रिल 2025 ला तुम्ही पैसे गुंतवू शकणार नाही.

हजार रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक :
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये तुम्ही फक्त हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचबरोबर दोन वर्षांच्या मॅच्युरिटीत काळापर्यंत तब्बल 2 लाख रुपयांएवढी रक्कम देखील तुम्ही साठवू शकता. एवढंच नाही जर एका वर्षानंतर तुम्हाला काही कारणामुळे पैसे काढून घ्यायचे असतील तर, तुम्ही जमा केलेल्या रकमेतून 40% रक्कम काढून घेऊ शकता.

2 लाखांच्या जमा रकमेवर किती परतावा मिळेल?
समजा 2 वर्षांमध्ये तुमची 2 लाखांएवढी रक्कम जमा झाली आहे. त्याचबरोबर मॅच्युरिटी पिरियड देखील 2 वर्षांचाच आहे तर, दोन वर्षानंतर तुमच्या हातात 2,32,044 एवढी रक्कम परत मिळेल. म्हणजे तुम्हाला एकूण फायदा 32,044 रुपये एवढा होईल.

Latest Marathi News | Smart Investment in Mahila Samman Saving Certificate 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या