शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
पुणे: हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा या ठिकाणी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून आदेश काढण्यात येणार आहे. १ जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक कोरेगाव-भीमा या ठिकाणी येत असतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठीच नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येतं आहे. रविवारी पुण्यात याबाबत बैठक झाली. या बैठकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एकबोटे आणि भिडे यांना जिल्हा बंदी करणार असल्याची माहिती दिली.
१ जानेवारीला हा कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे या भागाची रोज पाहणी करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास ९८६०२७२१२३ व ०२१३७२८६३३३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन शेलार यांनी केले आहे.
तत्पूर्वी कोरेगाव भीमा येथील हिंसाचारानंतर अर्बन नक्षल असल्याच्या आरोपाखाली सुधा भारद्वाज यांच्यापासून ते शोमा सेन यांच्यापर्यंत अनेक नामवंत बुद्धिवंत, काही वकील व दलित हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते. आनंद तेलतुंबडे व गौतम नवलाखांसारख्या बुद्धिवंतांचाही ताबा घेण्यासाठी पोलिस न्यायालयात गेलेले आहेत.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकरणी पोलिसांना पूर्ण कारवाईची पूर्ण मोकळीक दिली होती. मात्र या प्रकरणी नक्की नक्षलवादी संघटनेशी कुणाचे संबंध आहेत व कुणाचे नाहीत याची योग्य ती शाहनिशा करण्याऐवजी नक्षलवादाबाबत अभ्यास करत असल्याचा दावा करणाऱ्या या एका एनजीओची मदत घेण्यात आल्याचे आता गृह खात्यातील काही अधिकाऱ्यांनी पवारांच्या कानावर घातले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता असल्याचे दिसते.
Web Title: Bhima Koregaon Shaurya Din Milind Ekbote and Sambhaji Bhide Banned in Pune by district Police.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार