27 April 2025 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

या निवडणुकीच्या निकालांनंतर राज्य सरकार व नेतृत्व बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल - गिरीश बापट

BJP MP Girish Bapat, MahaVikas Aghadi government

पुणे, १ डिसेंबर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून, मतदार यादीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान असणार आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली पार पडणाऱ्या या निवडणुकीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी सायंकाळी ४ ते ५ ही वेळ ठेवण्यात आली असून, इस्पितळांमध्ये दाखल असलेल्या मतदारांना मतदार केंद्रावर आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक निकालांनंतर राज्य सरकार आणि नेतृत्व बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल,’ असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांनी केलं आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल अशी भाकितं विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्यानं केली जात आहेत. त्याबाबत बापट यांना विचारलं असता हे सरकार स्वत:हून पडेल, असं ते म्हणाले. ‘महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. वेगवेगळी वक्तव्यं केली जात आहेत. समन्वयाच्या अभावामुळं हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळं हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही व त्यात आम्हाला रसही नाही. सरकार त्यांच्या वजनानेच पडेल. हे सरकार करोनाच्या काळातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे.

दुसरीकडे राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या सर्वांच्या सर्व जागांवर आम्हीच विजयी होणार असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या सर्व जागांवर जोरदार चुरस आहे, मात्र भारतीय जनता पक्षाला विजयाची पूर्ण खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नव्हे तर पुण्याची जागा तर एकतर्फी असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले .

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘पुणे पदवीधर मतदारसंघात आपण २ वेळा आमदार झालो आहोत. तेव्हा उमेदवार स्ट्रॉंग होते. आता तर उमेदवार विक आहे. अरुण लाड यांना घरचा रस्ता दाखवण्याचाच हा मार्ग आहे’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला आहे.

 

News English Summary: The process of changing the state government and leadership will begin after the election results of the graduate and teacher constituencies, ‘said BJP MP Girish Bapat from Pune.

News English Title: BJP MP Girish Bapat talked about MahaVikas Aghadi government stability news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या