यांच्या बापाची पेंड आहे का? | चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर निशाणा
पुणे, १३ ऑक्टोबर : बाजार समित्यांना सेस गोळा करता येणार नाही, अशी तरतूद केंद्र सरकारने नवीन कृषी कायद्यात केली आहे. मात्र, बारामती बाजार समितीने पत्रक काढून सेस गोळा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अरे सेस काय तुमच्या बापाची पेंड आहे. सेसचा मलिदा खायदा मिळणार नसल्याने विरोधकांची तडफड चालू आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीसाठी शेकडो ट्रॅक्टरची रांग पुणे-सोलापूर महामार्गावरती भाजपने लावली होती. वरवंडहून निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप चौफुला या ठिकाणी झाला आणि तिथं या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं. सभेत भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगिती बद्दल राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांकडून फक्त सेस गोळा करण्यासाठी या विधेयकाला विरोध होत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
भाजप या स्थगितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असून ही स्थगिती उठवली जाईल, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र ते यावरच थांबले नाहीत तर राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का असं.. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि पवारांना उद्देशून पुन्हा एकदा बापाचा उल्लेख केला.
शनिवारी पुण्यातच भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत असं म्हटलं होतं. पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीवरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या बापाचा उल्लेख केला होता.
News English Summary: The new agricultural law provides that market committees will not be allowed to collect cess. However, the Baramati Market Committee has announced that it will remove the sheet and collect cess. Several BJP leaders including Chandrakant Patil had participated in the rally. The BJP had lined up hundreds of tractors on the Pune-Solapur highway for the rally. The tractor rally which started from Varvand ended at Chaufula and from there the rally turned into a rally.
News English Title: BJP State President Chandrakant Patil criticized Sharad Pawar Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार