22 January 2025 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

#VIDEO: पुणे-नाशिकमध्ये मनसेच्या या पुराव्यामुळे होऊ शकते भाजपाची पोलखोल

Nashik, Raj Thackeray, Smart City, Development Plan, Devendra fadnavis

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.

दुसरीकडे मनसेने देखील पुण्यातील सर्वच मतदारसंघातून उमेदवार दिल्याने जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण २७ उमेदवार आहेत असून अनेक नवोदितांना सुवर्ण साधी मिळावी आहे. त्यात माहीम मतदारसंघातून माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान पुण्यात कसबा मतदारसंघातून अजय शिंदे, कोथरूड’मधून किशोर शिंदे, हडपसर वसंत मोरे आणि शिवाजीनगर’मध्ये सुहास निम्हण यांना मनसेकडून संधी देण्यात आली आहे. तर नाशिक मधून नितीन भोसले, दिलीप दातीर आणि नाशिक पूर्व येथून अशोक मुर्तडक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात राज ठाकरे आणि मनसेवर टीका करताना त्यांनी कोणताच विकास केला नाही असं म्हणत जहरी टीका केली होती. मात्र निवडणूक संपल्यावर आणि शहरात सत्ता स्थापन होताच त्याच मनसेच्या विकासाचा अभ्यास सुरु केला आणि त्यासाठी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी थेट नाशिकचा दौरा केला आणि तिथल्या विकासाची स्तुती केली होती. तसेच राज ठाकरेंना पुण्याला आमंत्रित करून विकासाच्या योजनांवर त्यांचं मार्गदर्शन देखील घेतलं होतं.

#VIDEO: त्याचा हा पुरावा

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x