16 April 2025 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

निवडणुकीत टिळेकर 'टिकणार' नसल्याने; महाजनादेश यात्रेच्या आडून वसंत मोरेंवर कारवाई?

MNS Corporator Vasant More, MNS Leader Vasant More, Hadapsar vasant More, CM Devendra Fadanvis, Mahajanadesh Yatra, tayta

हडपसर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या राज्यभर महाजानदेश यात्रा सुरु असून काल नगरवरून आता पुण्यातील हडपसर येथे धडकणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा जिथून जाते तिथल्या क्षेत्रातील विरोधकांना ताब्यात घेण्याचा धडाकाच मागील काही काही दिवसांपासून पोलिसांनी लावला आहे. या यात्रेदरम्यान विरोधकांनी कोणतीही निदर्शनं करू नये म्हणून पोलिसांना आधीच आदेश देण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, हडपसरचे भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचे अनेक गैरप्रकार मनसेचे नगरसेवक आणि सरचिटणीस वसंत मोरे यांनी उजेडात आणले आहेत. आमदार योगेश टिळेकर यांच्या विकासकामांचा फुगदेखील वसंत मोरे यांनी फोडल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. आमदार योगेश टिळेकर हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जातात, मात्र आमदारांच्या कामांची पोलखोल होतं असल्याने भाजप देखील अडचणीत आल्याचे स्पष्ट आहे.

त्यामुळेच राजकीय द्वेषातूनच नगरसेवक वसंत मोरे यांना अटक अटक झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून, मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा म्हणजे विरोधकांविरुद्ध केली गेलेली दडपशाही असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मात्र वसंत मोरे यांच्या विधानसभेच्या मोर्चेबांधणीने आमदार योगेश टिळेकर यांना धडकी भरली असून यंदा मनसे त्यांचा विधानसभेतील मार्ग कठीण करणार याची त्यांना चुणूक लागली आहे. अनेक भ्रष्टाचार बाहेर काढून देखील मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी लागू न दिल्याने वसंत मोरे थेट जाहीर प्रदर्शन मधून मतदाराकडेच विषय मांडल्याने भाजपाची हडपसरमध्ये अजूनच पंचायत झाली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या