3 December 2024 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू | 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल

Curfew in Pune

पुणे, ०९ सप्टेंबर | गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू, 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल – Curfew imposed in Pune from tomorrow :

उत्सव कालावधीतील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाईल:
पोलिसांकडून पुण्यात गणेशोत्सवासाठी यापूर्वीच आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, 700 अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल.

गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत यासाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील. उत्सव कालावधीतील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Curfew imposed in Pune from tomorrow.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x