चंपा'चे ते वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे | उपमुख्यमंत्री संतापले
पुणे, २२ नोव्हेंबर: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं पाटील यांनी मोठं कौतुक केलं होतं. फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची पूर्ण दक्षता त्यांनी घेतली. यासाठी खोलात जाऊन त्यांना कायद्याचा अभ्यास केला. असे असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजांत अंतर निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. असे विष कालवणाऱ्यांचा शर्ट धरला पाहिजे, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र त्यानंतर पाटील यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. ‘शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्यामुळेच ‘चंपा’चे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे’, अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फटकारले.
News English Summary: An OBC meet was held in Pune on Saturday to campaign for the Bharatiya Janata Party candidates in the Pune Graduate and Teachers constituency. Speaking at the rally, Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil had criticized NCP’s Sarveseva Sharad Pawar. ‘Before entering politics, I used to think Sharad Pawar was a great leader. But, when I came into politics, I realized that Sharad Pawar is a very small leader. They have no study ‘, was the statement made by Chandrakant Patil.
News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar slams Chandrakant Patil statement over NCP president Sharad Pawar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL