पुणेकरांचा दुपारी 'झोपा आणि झोपू द्या' नियम; आदित्य यांना 'नाईट लाईफ' प्रस्तावाची अपेक्षा? सविस्तर
मुंबई: २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. अशातच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra Tourism Minister
Aaditya Thackeray says shops, restaurants, malls and
pubs will remain open 24 hours on an experimental basis in a
few areas of Mumbai from January 26— Press Trust of India (@PTI_News) January 17, 2020
मुंबईत केमिस्ट, दवाखाने याबरोबर आता हॉटेल्स, मॉल, दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सर्वसामान्यांतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी याचा भार पोलिस यंत्रणेवर पडणार आहे. रात्रभर आस्थापना चालू राहिल्यास त्याचा परिणाम कायदा आणि सुवव्यस्थेवर पडण्याची शक्यता असल्याने दिवसाप्रमाणेच पोलिसांनी रात्रीही मनुष्यबळ कार्यरत ठेवावे लागणार आहे.
ऑनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार दिवस-रात्र सुरू असतात त्यामुळे दुकानदारांपुढे मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी राज्य सरकारनेच आता २४ तास दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा कायद्याद्वारे दिली आहे. मात्र त्यात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. भाजपने मात्र यानिर्णयावर टीका केली आहे. ऍमेझॉनसारख्या कंपन्यांमुळे इथला स्थानिक व्यापारी अडचणीत आहे. व्यापार, मॉल आणि व्यापाऱ्यांना जरूर मदत करायला हवी. पण डिस्को, पब, बार, लेडीज बार २४ तास सुरू ठेवण्याची आवश्यकता काय, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. निवासी भागात रात्रभर बार, पब, सुरू ठेवण्यास भाजपने विरोध केला आहे.
शेलार म्हणाले, “जो मुंबईकर दिवसभर थकून आपल्या घरी हक्काची झोप घेतो अशा मुंबईकरांची झोपमोड करणारा, शांतता भंग करणारा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’ असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
व्यापार वाढीसाठी 24×7 माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे..पण त्याच गोंडस नावने रात्रभर बार,लेडिजबार,पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात,पोलिसांवर ताण.. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 18, 2020
दरम्यान, काल पिंपरी-चिंचवड एका कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले असता त्यांना पत्रकारांनी पुण्यामध्ये नाईट लाईफ संकल्पना राबवणार का असा प्रश्न विचारला. त्यावर, प्रस्ताव आल्यास पुण्यातही ‘नाईट लाईफ’बाबत विचार करू, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, मुंबई येथे रात्रभर वर्दळ सुरू असते. प्रवास करून कामावरून रात्री उशिरा घरी परत येणाऱ्या नागरिकांना खरेदी करता यावी, भूक लागली असल्यास त्याला जेवण सहज उपलब्ध व्हावे. यासाठी रात्रीदेखील शॉपिंग मॉल, दुकाने, हॉटेल सुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असून शासनाच्या उत्पन्नात वाढ होईल. पुण्यातदेखील कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे.
वास्तविक पुणेकर दुपारी १ ते ४ यावेळेत झोपणं पसंत करतात आणि हा स्वयंघोषित नियम ते स्वतः काटेकोरपणे पाळतात आणि त्यात हक्काचा रविवार असल्यावर विचारायला नको. त्यामुळे रात्रीच्या हक्काच्या झोपण्याचा वेळेत ते नाईट लाइफला किती स्वीकारतील ते पाहावं लागणार आहे.
Web Title: Environment Minister Aaditya Thackeray talks about Pune Nightlife says if Proposal comes then we can start Nightlife in Pune.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या