23 December 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर…

Deputy CM Ajit Pawar, Pune Municipal corporation, Chandrakant Patil

पुणे, १० ऑक्टोबर : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टोला लगावला. पुण्यामध्ये आयोजित एका पक्षांतर्गत कार्यक्रमावेळी बोलताना पाटील यांनी, “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांमध्ये पवार यांना टोला लगावला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे महानगरपालिकेत काल झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अपेक्षित वर्चस्व राहिले. सोळा प्रभाग समित्यांपैकी ११ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या जागा भाजपला मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला ४ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. याबाबत टिपणी करताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

पाटील म्हणाले, “पुणे महानगरपालिकेत काल झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली तर अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वायाला घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत,”

प्रचंड मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान:
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजप हा प्रचंड मोठा पक्ष असून त्याचे आपण कार्यकर्ते असल्याचा अभिमान वाटायला हवा असं मत व्यक्त केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहेत ज्यांना सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि सन २०२०च्या निवडणुकीत ३०३ खासदार आपले मिळाले आणि मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत, अशा एका प्रचंड मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.” असं पाटील म्हणाले.

 

News English Summary: Maharashtra BJP state president Chandrakant Patil today lashed out at Deputy Chief Minister Ajit Pawar. Speaking at a party function in Pune, Patil said, “If Ajit Pawar has any dreams about power in Pune Municipal Corporation, don’t waste energy in this regard. We are your father.”

News English Title: If Ajit Pawar has any dreams about power in Pune Municipal corporation Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x