26 April 2025 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

“हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”: अभिनेते प्रवीण तरडे

marathi actor pravin tarde, Hyderabad police action on rape case

हैदराबाद: हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

चारही आरोपी १० दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. ४ डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत. दरम्यान, राजकीय क्षेत्रातून आणि चित्रपट क्षेत्रातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”, अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी पोलीस चकमकीचं समर्थन केलं आहे.

काँग्रेसच्या आमदार प्राणितीं शिंदे यांच्याकडून हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन, तसेच पोलिसांच्या या कारवाईने मुलींना आणि महिलांना बळ मिळालं आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. सरकारने आणि कोर्टाने त्यांच्या पाठिशी राहिलं पाहिजे. उन्नावबाबतीत जे घडलं तसं यापुढे व्हायला नको. आरोपींनी जेलमधून सुटून बलात्कार पीडितेला जाळलं हे कृत्य निषेधाचं आहे असंही मत प्रणिती शिंदे यांनी मांडले आहे.

तत्पूर्वी सदर एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अशामार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही. आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनांवर पडदा पडावा यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते खरोच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, पण या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

तसेच हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हतं,’ असं स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. ‘झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,’ असंही निकम यांनी सांगितलं.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली.

दरम्यान, माझ्या मुलीचा मृत्यू होऊन १० दिवसांचा काळ लोटला आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशा शब्दात प्रतिक्रिया देत त्यांनी या एन्काउंटरबाबत तेलंगण सरकारचे अभिनंदन केले आहे. तर, हे आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले हे ऐकून मला अतिशय आनंद झाल्याचे बलात्काराची बळी ठरलेल्या महिला डॉक्टरच्या बहिणीने म्हटले आहे.

हे चार आरोपी अशा प्रकारे एन्काउंटरमध्ये ठार झाल्याने हे एक उदाहरण म्हणून कायम राहील. अतिशय रेकॉर्ड वेळेत आम्हाला न्याय मिळाला आहे, असे म्हणत या बहिणीने त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या