22 January 2025 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

पवार साहेबांमुळे कायमची सकाळी लवकर उठायची सवय लागली: अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar, Pune SRA

पुणे: ‘काम चांगलं झालं तर किरकोळ चुका देखील पोटात घेऊ, पण कामं झाली नाहीत, तर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू,’ असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना भरला. पुणे शहरातील चुकलेल्या उड्डाणपुलांच्या बाबतीत काही तरी निर्णय घ्यावाच लागले, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. पुढे उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, आज पुण्यात एसआरए प्रकल्पाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे भाडे महिन्याला बारा लाख रुपये आहे. त्यामुळे या कार्यालयात येणार्‍या प्रत्येक सर्व सामान्य नागरिकाचे समाधान होईल. असे काम करा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी अधिकारी वर्गाला दिला.

तसेच ते पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी फार नियमांवर बोट ठेऊन चालू नये, त्यातून व्यवहारी मार्ग काढा, मी तर आता झोपूंच्या प्रकल्पांचा दर आठवड्यालाच आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे विद्यापीठ चौकातील एक दोन उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने बांधले गेल्याचं अनेकांचे म्हणणे आहे. त्यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘दादांचा जेवढा उरक आहे, तेवढा आमचा नसेल कदाचित. कारण दादांनी लावला सकाळी १० वाजता कार्यक्रम. मी निघालो ठाण्याहून. काल रात्रीचा माझा कार्यक्रम. कारण मी बंगल्यावरच बसतो १०-११ वाजेपर्यंत. तेव्हा दादा, जरा यापुढचे कार्यक्रम ११ नंतर घेतलेत, तर आमची झोप पूर्ण होत जाईल. प्रवासाचा वेळही तेवढा कमी होईल’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पण जितेंद्र आव्हाडांच्या विनंतीला अजित पवारांनीही गमतीने उत्तर दिलं. ‘गमतीचा भाग जाऊ द्या, पण शरद पवार साहेबांचं राजकारण समाजकारण जवळून पाहिलेलं. पवार साहेब मुख्यमंत्री असताना कधी रात्री २ वाजता झोपायचे, तरी सकाळी ७’ला तयार असायचे. ती जी सवय लागली. ती कायमची लागली, तशी सवय तू पण लावून घेतली, तर बरं होईल. सात वाजता निघायचं नाही, कामाला लागायचं. त्यासाठी तिथनं चारला निघाला असतास, तर इथे सातला पोहचला असतास’ अशा कानपिचक्याही अजित पवारांनी लगावल्या.

 

Web Title:  Minister Ajit Pawar suggests Minister Jitendra Awhad to wake up early in fun banter in Pune SRA officers Meet.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x