15 January 2025 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

अभिमान आहे मी राज ठाकरे यांचा नगरसेवक आहे, आम्ही कोणाच्या पाया पडत नाही - वसंत मोरे

MNS corporator Vasant More, Pune, Shivsena

पुणे, १० जुलै : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. ४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत २० मिनिटं चर्चा केली होती.

शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला. पाचही नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधलं. तत्पूर्वी सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात ही भेट घडवून आणली. अजीत पवार, पाच नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्ध्या तास चर्चा झाली. नंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन आले होते.

दरम्यान याच विषयाला अनुसरून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे पारनेरमधील झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेवर टीका केली आहे. वसंत मोरे म्हणाले की, आम्ही डरकाळी फोडली आणि ५ पळून गेलेले नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असे समजू नका. हा भारत देश आहे, इकडे पतिव्रता असलेल्या सितामाईला ही रावणाने पळवून नेल्यानंतर जेव्हा परत आणलं गेलं तेव्हा सीतामाईलाही अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. त्यामुळे तुमचे नगरसेवक कुठली परीक्षा देणार असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच मला अभिमान आहे मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा नगरसेवक आहे. जो गेला उडत तो गेला उडत आम्ही कोणाच्या पाया पडत नाही, असा टोला देखील वसंत मोरे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

 

News English Summary: MNS Pune corporator Vasant More has criticized Shiv Sena on Facebook after the incident in Parner. Vasant More said, “We broke the fear and 5 fleeing corporators came back, so don’t think that we have won a big battle.”

News English Title: MNS corporator Vasant More has criticized Shivsena News Latest Updates.

हॅशटॅग्स

#VasantMore(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x