साधी ग्रामपंचायतही न लढणारा अन बी-ग्रेडमधून हकालपट्टी केलेल्या चाटकरी पोपटाला सल्ला... रुपाली पाटील संतापल्या
पुणे, २१ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अत्यंत जहरी शब्दात प्रतिउत्तर दिलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मिटकरी यांनी राज ठाकरेंवर थेट राष्ट्रद्रोहाचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती!अपयशी नेत्याला
उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे ..@TV9Marathi— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 20, 2021
मनसेच्या पुण्यातील महिला पदाधिकारी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील आमदार अमोल मिटकरी यांना थेट इशारा (MNS Pune leader Rupali Patil Thombare criticized NCP MLA Amol Mitkari after statement against Raj Thackeray) :
आता मिटकरींवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय. समाज माध्यमांवर मिटकरींची जोरदार खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली असून अनेकांनी त्यांना थेट इशारा देखील दिला आहे. मनसेच्या पुण्यातील महिला पदाधिकारी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील आमदार अमोल मिटकरी यांना थेट इशारा दिला आहे.
रुपाली पाटील-ठोंबरे यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकताना म्हटलंय की, “साधी ग्रामपंचायत हि लढू न शकनारा बी-ग्रेड मधून हकालपट्टी केलेला भ्रष्ट्रावादि च्या पाळीव चाटकरी पोपटाला सल्ला… इथल्या मराठी अस्मितेसाठी संबंध आयुष्य झिजवणाऱ्या राजसाहेबांना “राष्ट्रद्रोही” म्हणजे म्हणजे काळतोडयाने केलेला मराठीद्रोह होय… आधी धर्मात आणि आता जातीत तुकडे करणाऱ्या #भ्रस्टवादि ने पाळीव #बाजारू पोपटाला आवरावे तसेच थोरल्या साहेबांनी आपल्या दावणीला घट्ट बांधून टाकावे नाहीतर खळखट्याक अटळ आहे. चुकीला माफी नाही. दोन पक्ष अध्यक्ष बोलत असताना मध्ये आपलं काळ तोंड खुपसवू नये. (MNS Pune leader Rupali Patil Thombare criticized NCP MLA Amol Mitkari)
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MNS Pune leader Rupali Patil Thombare criticized NCP MLA Amol Mitkari after statement against Raj Thackeray news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY