23 February 2025 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पुणे | भाजपची सत्ता असल्याने महापौरांनी लस बाबत मोठी घोषणा केली, पण केंद्राने दिल्या एवढ्याच..

Modi govt, Covid vaccine, Pune city

पुणे, १० एप्रिल: कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडीशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे.

त्यानंतर राज्यांना पाठवण्यात येणाऱ्या लसीमध्ये राजकारण हाेत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे. काेलकात्यामध्ये एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लसीची काेणतीही कमतरता नाही. सर्व राज्यांच्या गरजेनुसार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरीकडे काही राज्यांमधील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे.

काल भाजपाची सत्ता असलेल्या पुणे शहरातील महापौरांनी मोठी घोषणा केली होती. परंतु त्या घोषणेला मोदी सरकारने ठेंगा दाखवत अल्प असा पुरवठा केला आहे. वास्तव घोषणा केल्या पेक्षा अगदी थोड्याच लसी आल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र आज देखील बंदच राहिली आहेत.

केंद्र सरकारकडून पुण्याला २ लाख ४८ हजार कोरोना लसी मिळणार असल्याची मोठी घोषणा काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. यात पुणे शहराला ४० टक्के, ग्रामीणला ४० टक्के आणि पिंपरी-चिंचवडला २० टक्के लस मिळणार असे देखील सांगण्यात आले होते. रविवारीही पुणे जिल्ह्याला १ लाख २५,००० लस मिळणार असाही दावा करण्यात आला होता. आधीच तुटवडा आहे आणि आता इतक्याच लसी आल्याने त्या नेमक्या वाटायच्या तरी कोणाला आणि कशा असा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावतो आहे.

 

News English Summary: The BJP ruled mayor of Pune had made a big announcement. However, the Modi government has shown little support to that announcement. Many vaccination centers remain closed today due to fewer vaccinations than actually announced.

News English Title: Modi govt provide very less count of covid vaccine to Pune city news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x