23 February 2025 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

३७०च्या मुद्द्याआड शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई'बाबत सत्ताधारी पळ काढत आहेत: अजित पवार

Ajit Pawar, BJP, Shivsena, Article 370

पुणे: पवार म्हणाले,की भाजपकडून विधानसभा निवडणुकीतही ३७० चा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? गेल्या पाच वर्षांत भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरीविरोधी फडणवीस सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अधोगतीकडे नेले. शेतीमालाला भाव, कर्जमाफी, नोकरभरती, बेरोजगारी, धनगर आरक्षण अशी कित्येक उदाहरणे देता येतील.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

पुढे अजित पवार म्हणाले “मी पार्थचा बाप आहे. त्याने विधानसभेला येऊ नये असं मला वाटतं. आम्ही आमच्या घरात काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही पक्षासंबंधी चर्चा करा,” असं संतापाच्या भरात अजित पवार म्हणाले. त्यानंतर मात्र पवार स्वतःच खळखळून हसले आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले.

पुढे अजित पवार यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील सडकून टीका केली. ते म्हणाले, चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे कसं अजित पवार तसं चंपा. ते जे काही म्हणतात त्याला काहीही अर्थ नाही. ते शऱद पवार यांनाही राजकारणातून बाजूला जातील म्हणतात. तुम्हाला तरी पटतं का? असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. पवारसाहेब कधी राजकारणातून बाहेर जातील का, त्यांनी किती चढ-उतार पाहिलेत. ५५ पैकी केवळ ५ आमदार उरल्यानंतरही ते तितक्यात तडतडीत बाहेर पडले. आजही, किती आक्रमकपणे ते महाराष्ट्रात आपली भूमिका मांडतायंत. मला हे सरकार बदलायचंय असं सांगत महाराष्ट्रभर फिरतायंत, असे सांगत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं.

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, अशी परिस्थिती होते आहे. बेकारी वाढत राहिल्यास रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल. मुख्यमंत्र्यांनी अनेक मंत्र्यांना पायउतार केले. काहींची खाती बदलली. खडसे, तावडे, पुरोहित, मेहता यांची तिकिटे कापली. त्याची उत्तरे मात्र मुख्यमंत्र्यांनी दिली नाहीत, असेही ते म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x