15 January 2025 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
x

राष्ट्रवादीच्या जंगी सभा गाजवणाऱ्या अमोल मिटकरींची विधानपरिषदेवर वर्णी लागणार; अजितदादांचे संकेत

NCP MLA Amol Mitkari, NCP MLA Ajit Pawar

पुणे: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानपरिषद ते विविध महामंडळांची तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र, त्यात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांची विधानपरिषेदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे, कारण तसे थेट संकेत स्वतः अजित पवारांनी दिल्याने मार्ग सुकर असल्याचं म्हटलं जातं आहे.

अमोल मिटकरी यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सभा गाजवल्या होत्या. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार, अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या इतकीच पसंती देण्यात आली होती. त्यात, त्यांच्या तडफदार आणि न अडखळता प्रतिस्पर्धीना भाषण शैलीतून झोडपून काढण्याच्या कौशल्यामुळे ते पक्षात देखील चर्चेचा विषय ठरले होते.

कोणताही पक्ष गावा गावात मोठा करायचा असेल तर आणि विशेष करून ग्रामीण महाराष्ट्रात तर उत्तम संवाद आणि भाषणशैली असणारी नेते मंडळी पक्षात असणं गरजेचं असतं. कारण त्यातूनच पक्ष आणि उमेदवार मतदाराच्या मनात बिंबवता येतो आणि तीच जवाबदारी अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या सभांमधून पार पाडली होती. राज्यभर पक्ष वाढवायचा म्हटल्यावर पक्षात केवळ शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एवढ्यावरच अवलंबून न राहता, खासदार अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, आमदार रोहित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यासारखी फौज २०२४च्या अनुषंगाने उभी करण्याची रणनीती राष्ट्र्वादीने आखली असून, तडफदारपणे पक्षाचा आणि उमेदवारांचा प्रचार करतील अशांना पक्ष स्वतःहून पुढे आणत आहे.

अजितदादांनी पुण्यातील मेळाव्यात मिटकरी यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांना आमदार करण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरणार आहे, असेही जाहीर केले. अजित पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यापाठोपाठ खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मिटकरी यांच्या सभांना प्रचंड मागणी होती. काही मतदारसंघातून केवळ मिटकरी यांच्या सभांसाठीच प्रयत्न केले जात होत. या काळात मिटकरी यांनी सभा गाजविल्या आहेत. त्यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबत माझा आग्रह आहे.”

दरम्यान, विधानसभेआधी लोकसभा निवडणुकीतही मिटकरी यांनी सभा घेतल्या. भाषणांमुळे त्यांच्या सभा प्रचंड गाजल्या आणि त्यानिमित्ताने ते राजकीय वर्तुळात चर्चेत आले. मात्र, आपल्या प्रत्येक सभांमध्ये मिटकरी विशेषत: शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील सभांमधून झोडपून काढल्याचं पाहायला मिळालं होतं. थेट अमित शहा ते आदित्य ठाकरे अशा सर्वच प्रमुख विरोधकांवर त्यांनी त्यांच्या तडफदार भाषण शैलीतून तोंडसुख घेतलं होतं.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी २५ हजार कोटींची मागली केली जात असल्याने केंद्राकडून देखील मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री किंवा केंद्रीय अर्थमंत्री यांच्या भेटीगाठी घेणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय हालचाली पाहता दोन्ही बाजूचे नेते मंडळी कोणाचीही भेट घेऊन त्याचा संदर्भ थेट शेतकऱ्यांशी जोडत असल्याचे पाहायला मिळत होतं. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि प्रसार माध्यमांनी भेटीचे कारण विचारताच फडणवीसांनी सदर भेटीचे कारण शेतकरी आणि ओला दुष्काळाच्या मदतीच्या संदर्भात भेट घेतल्याचं उत्तर दिलं होतं. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविणारं ट्विट केलं होतं आणि त्याची चर्चा रंगली होती.

 

Web Title:  NCP Leader Amol Mitkari May Get Opportunity on MLC after Ajit Pawar Statement at Pune.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#AmolKolhe(14)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x