23 February 2025 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आयत्या बिळात चंदूबा..राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला

Twitter, Jayant Patil, Chandrakant patil,, Kothrud Vidhansabha, Maharashtra Vidhansabha Election 2019

पुणे: विधानसभा निवडणुकीचे मतदान जसजसे जवळ येऊ लागले आहे, तशी प्रचाराला धार चढली आहे. वर्तमानपत्रे, मोबाइल, टीव्ही वाहिन्यांसह सोशल मीडियातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढणारे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज एका जुन्या मराठी म्हणीचं विडंबन करून पाटलांवर हल्ला चढवला आहे.

राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आज एक पोस्ट टाकण्यात आली आहे. ‘आयत्या बिळात चंदूबा…’ असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. ‘आयत्या बिळावर नागोबा’ या म्हणीत फेरफार करून ही म्हण बनवण्यात आली आहे. ‘कोथरूडमध्ये ‘चंपा’ जे करताहेत ते…’ असा या म्हणीचा अर्थही सोबत देण्यात आला आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

कोल्हापूरमधून पुण्यात निवडणूक लढविण्यासाठी आलेल्या चंद्रकांत पाटलांना विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. ‘चंपा’ या नावाने चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यात येत आहे. मात्र माझी आई लाडाने मला चंदा बोलते असं सांगत चंद्रकांत पाटलांनीही विरोधकांची फिरकी घेतली आहे. अशातच राष्ट्रवादीकडून काही मराठी म्हणींचे नवे अर्थ निघू लागलेत सांगत कोथरुडमध्ये बाहेरून आलेले चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळात चंदूबा असं करुन चिमटा काढण्यात आला आहे.

कोथरुड मतदारसंघात मनसेने स्थानिक उमेदवार म्हणून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद देखील आहे. किशोर शिंदे यांना मोदी लाटेतही या मतदारसंघातून २३ हजारांहून अधिक मते पडली होती. तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे हे २००९ मध्ये या भागाचे आमदार होते. त्यांना २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमाकांची मते पडली होती. यंदा या मतदारसंघातून काँग्रेस-एनसीपीने उमेदवार न देता किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाकडून लढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आपला गड कायम राखणार की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन धावणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x