23 February 2025 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोरेगाव भीमा : विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Bhima Koregaon, Pune, Minister Ajit Pawar

पुणे: आज सकाळपासून राज्यभरातून हजारो संख्येने भाविक याठिकाणी येत आहेत. उत्साहाचे वातावरण येथे असून, नागरिकांकडून रांगेत येऊन विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येत आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व जिल्हाप्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी इंटरनेट वापराला अडचण येते. तेव्हा नागरिकांना तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी खास “इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन’ची व्यवस्था जिल्हाधिकारी प्रशासनाने केली आहे. तसेच, पोलिस व अन्य सेवांसाठी खास हॉटलाइनचीही व्यवस्थाही केली आहे.

या परिसरातील खासगी कंपन्या, शाळा, आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, सणसवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यंदा पोलिसांनी चांगली व्यवस्था केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर, प्रशासनाकडून सर्व काळजी घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अभिवादनानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला नवीन वर्षाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, येथील शौर्यस्तंभास एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्यासंख्येने नागरिक येतात, मी राज्यातील जनतेच्यावतीने येथील शौर्यस्तंभास अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या, मात्र सरकार त्यामध्ये चांगल्याप्रकारची काळजी घेत आहे. आज देखील पोलीस व प्रशासनाकडून बंदोबस्त अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. माझं या निमित्त नागरिकांना आवाहन आहे की, अनेकजण या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात, त्यांनी जरूर या ठिकाणी यावं परंतु येत असताना शांतता राखावी, कोणत्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये.

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

 

Web Title:  No one should believe on rumors Minister Ajit Pawars greetings Vijayanatha Bhima Koregaon.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x